शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवरून 11 तोतया टीटीईंना अटक; 15 दिवस ड्युटी, कोणालाच थांगपत्ता नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 13:20 IST

New Delhi Railway Station : हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील सर्वात महत्त्वाच्या नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर (New Delhi Railway Station) 11 तोतया टीटीई ड्युटी करताना पकडण्यात आले. हे आरोपी 15 दिवस स्टेशनवर ड्युटी करत होते आणि त्याचा कोणालाच पत्ता नव्हता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, आरपीएफने या आरोपींना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

एका वृत्तपत्रानुसार, 15 दिवसांपासून हे 11 बनावट टीटीई दिल्लीतील रेल्वे स्टेशनवर ड्युटी करत होते. पांढरा शर्ट व काळी पँट परिधान करून ते तिकिट तपासणीचे काम करत होते. रेल्वे अधिकाऱ्याच्या संशयावरून हा प्रकार उघडकीस आला असून तीन तरुणांना अटक करण्यात आली आहे. आरपीएफ आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी या 11 बनावट तिकीट तपासकांना रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आल्याचे रेल्वे डीसीपी हरेंद्र सिंह यांनी सांगितले. त्याचबरोबर इतरांच्या भूमिकेबाबत तपास सुरू आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रेल्वे अधिकारी रितेश वाधवा कानपूर शताब्दी येथून प्रवास करत होते. ट्रेन गाझियाबादला पोहोचली तेव्हा त्यांना एक व्यक्ती तिकीट तपासताना दिसली. चौकशीत त्यांना संशय आला. त्यानंतर त्याला नवी दिल्ली स्थानकात पकडण्यात आले. गोरखपूर येथील भूपेंद्र चौरसिया असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अशाच आणखी 10 तरुणांना पकडण्यात आले. काहींची बनावट नियुक्तीपत्रे होती.

सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित अत्यंत सुरक्षित नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर एकाच वेळी 11 तोतया टीटीईंना अटक करण्यात आल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी 15 दिवस रेल्वे स्टेशनवर यायचे, ड्युटी करायचे आणि परत जायचे. मात्र रेल्वे प्रशासन किंवा सुरक्षा यंत्रणांना त्याची माहितीही नव्हती. रेल्वे स्थानकावरून एवढ्या मोठ्या प्रमाणात तोतया टीटीई पकडण्याची राजधानीत ही पहिलीच वेळ आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे