शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अभिमानास्पद! 'कॅट'मध्ये महाराष्ट्राचा झेंडा; टॉप 11मध्ये राज्यातील 7 जण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 15:42 IST

11 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; एकाही विद्यार्थिनीचा समावेश नाही

मुंबई: गेल्या वर्षी झालेल्या कॉमन ऍडमिशन टेस्टचा (कॅट) निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं. परीक्षेतील 11 टॉपर्सपैकी 7 विद्यार्थी महाराष्ट्राचे आहेत. या परीक्षेत एकूण 2 लाख विद्यार्थ्यांनी यश मिळवलं. पर्सेंटाईल गुणांचा विचार केल्यास 11 विद्यार्थ्यांना 100 टक्के मिळाले आहेत. हे सर्व अभियांत्रिकी विभागाचे विद्यार्थी आहेत. मात्र यात एकाही विद्यार्थिनीचा समावेश नाही. कॅट 2018 मध्ये 100 पर्सेंटाईल गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 11 इतकी आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर तब्बल 21 विद्यार्थी आहेत. त्यांना 99.99 टक्के गुण मिळाले आहेत. यातील 19 विद्यार्थी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शाखेचे आहेत. आयआयएम कोलकातानं ही आकडेवारी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून जाहीर केली आहे. अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी बिझनेस स्कूलकडे वळत असल्याचं यातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. 25 नोव्हेंबर 2018 रोजी कॅट परीक्षा झाली होती. दोन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. देशातील 147 शहरांमध्ये दोन सत्रांमध्ये ही परीक्षा झाली होती. यामध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. देशातील एकूण 11 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल गुण मिळवण्यात यश आलं. यातले 7 विद्यार्थी एकट्या महाराष्ट्रातले आहेत. ठाण्याच्या रौनक मुजूमदारनं 100 टक्के गुण मिळवले. रौनक आयआयटी कानपूरचा विद्यार्थी आहे. पश्चिम बंगालच्या दोन, कर्नाटक आणि बिहारच्या प्रत्येकी एका विद्यार्थ्याला 100 टक्के गुण मिळवता आले.  

टॅग्स :examपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्र