शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Burari Case : 11 मृतदेह अन् 'ते' 11 पाईप; बुरारी सामूहिक आत्महत्या प्रकरणाचं गूढ वाढलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 13:04 IST

11 पाईप्सपैकी 7 सरळ आणि 4 वळलेल्या स्थितीत

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील बुरारी भागातील संतनगरमधील एका घरात 11 मृतदेह आढळून आल्यानं खळबळ माजली आहे. एकाच घरातील 11 जणांच्या आत्महत्येची देशभरात चर्चा आहे. या प्रकरणाचा दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे. यामधून अनेक रहस्यमय बाबी समोर आल्या आहेत. या कुटुंबानं पूर्ण तयारीनिशी आत्महत्या केल्याचं तपासादरम्यान हाती लागलेल्या पुराव्यांवरुन स्पष्ट झालं आहे. अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यानं हा प्रकार घडला असावा, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 11 मृतदेह आढळून आलेल्या घरात सापडलेल्या रजिस्टरमधील मजकुरातून या संपूर्ण प्रकरणामागे अंधश्रद्धा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता पोलिसांना घरात 11 पाईप आढळून आले आहेत. घराच्या भिंतीवर बाहेरच्या बाजूला अतिशय कमी भागात 11 पाईप अगदी आसपास लावण्यात आले आहेत. यातील 7 पाईप सरळ आणि 4 वळलेले आहेत. मृतांमध्ये 7 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश असल्यानं याबद्दलचं गूढ वाढलं आहे. या पाईप्समधून पाणी बाहेर पडल्याच्या कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत. त्यामुळे हे 11 पाईप नेमके कशासाठी लावण्यात आले होते, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दिल्लीतील बुरारीमधील ज्या घरात 11 जणांचे मृतदेह आढळले, त्या घरात सापडलेल्या कागदपत्रांमधील माहिती अतिशय धक्कादायक आहे. पोलिसांना तपासादरम्यान घरात दोन रजिस्टर आढळून आले आहेत. यामध्ये जो मजकूर आहे, अगदी त्याचप्रकारे घरातील एका खोलीत 10 मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. तर अकरावा मृतदेह दुसऱ्या खोलीत सापडला. 'तुम्ही जर टेबलाचा वापर करुन डोळे बंद केलेत आणि हात बांधलेत, तर तुम्हाला मोक्षप्राप्ती होईल,' असा मजकूर रजिस्टरमध्ये आढळून आला आहे. त्यामुळे अंधश्रद्धेतून या कुटुंबानं स्वत:चा अंत केला असावा, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही रजिस्टरमधील काही पानांमधील माहिती धक्कादायक आहे. कोणत्या व्यक्तीनं कुठे लटकायला हवं, याचा तपशील रजिस्टरमध्ये आहे. कुटुंबातील कोणत्या व्यक्तीनं कुठे लटकूवन जीव द्यावा, याची नोंद रजिस्टरमध्ये आहे. घरात आढळलेले मृतदेह अगदी रजिस्टरमध्ये केलेल्या नोंदीनुसार लटकलेल्या अवस्थेत सापडल्यानं पोलिसही आश्चर्य व्यक्त करत आहेत.  

टॅग्स :Burari Deathsबुरारी मृत्यूCrimeगुन्हाMurderखूनDeathमृत्यूdelhiदिल्ली