.......... दहावी गुणवंत सत्कार............. बातमीस जोड-१

By Admin | Updated: June 12, 2015 17:37 IST2015-06-12T17:37:59+5:302015-06-12T17:37:59+5:30

डॉ. जाकीर हुसेन शाळा : शहरातील कोल्हे नगरातील डॉ. जाकीर हुसेन शाळेचा निकाल ८५ टक्के लागला आहे. जवेरिया पटेल (प्रथम), इशरत बेग (द्वितीय), शाहीन शेख (तृतीय) आले आहेत. तसेच आकांक्षा नाटकर, समिना शेख, प्रणित बासेवाड यांनी यश मिळविले आहे. या गुणवंतांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी संस्था सचिव के.एस. कादरी, फसियोद्दीन सिद्दीकी, असिर कादरी, प्राचार्य रियाज अहेमद सिद्दीकी, शेख सत्तार, अमजत खान, हलिमा बागवान, जिलानी शेख, तस्लीम अत्तार आदींनी केले.

.......... 10th Quality felicitation ............. | .......... दहावी गुणवंत सत्कार............. बातमीस जोड-१

.......... दहावी गुणवंत सत्कार............. बातमीस जोड-१

. जाकीर हुसेन शाळा : शहरातील कोल्हे नगरातील डॉ. जाकीर हुसेन शाळेचा निकाल ८५ टक्के लागला आहे. जवेरिया पटेल (प्रथम), इशरत बेग (द्वितीय), शाहीन शेख (तृतीय) आले आहेत. तसेच आकांक्षा नाटकर, समिना शेख, प्रणित बासेवाड यांनी यश मिळविले आहे. या गुणवंतांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. यावेळी संस्था सचिव के.एस. कादरी, फसियोद्दीन सिद्दीकी, असिर कादरी, प्राचार्य रियाज अहेमद सिद्दीकी, शेख सत्तार, अमजत खान, हलिमा बागवान, जिलानी शेख, तस्लीम अत्तार आदींनी केले.
जिजामाता विद्यालय : शहरातील एमआयडीसी परिसरातील जिजामाता माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. गोवर्धन खाडप (प्रथम), सौरभ खिरापते (द्वितीय), अनिकेत कदम (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष मुकुंदराव सरवदे, सचिव आ. विक्रम काळे, शुभांगी काळे, अनिल काळे, डॉ. वसंतराव भिसे, प्रा. गंगाधर हिंगोले, प्रभारी मुख्याध्यापक के.एन. बिरादार, सय्यद, गुडे, बावणे, मतकंटे, शिंदे, म्हेत्रे, पांचाळ, वाघमारे, साबळे, देशमुख, पवार आदी उपस्थित होते.
शामराव पाटील विद्यालय : शहरातील मित्र नगर येथील श्री शामराव पाटील विद्यालयाचा निकाल ९२.८५ टक्के लागला आहे. संदीपान बु˜े, वासुदेव रोडगे, जयराम लांडगे, निखिल तरटे हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. या गुणवंतांचे कौतुक शाळेच्या वतीने करण्यात आले.
जीवन विकास विद्यालय : शहरातील साई रोड येथील जीवन विकास माध्यमिक विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. ओंकार भिसे (प्रथम), शफिक शेख (द्वितीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक शाळेच्या वतीने करण्यात आले.
विशाल विद्यालय : शहरातील प्रगती नगरातील विशाल माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९५ टक्के लागला आहे. देविका तोडकरे (प्रथम), कैलास स्वामी (द्वितीय), रोहिणी पांचाळ (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक संस्था सचिव मधुकर पात्रे, मुख्याध्यापक, शिक्षकांनी केले.
जिजामाता कन्या प्रशाला : शहरातील नांदेड रोड येथील जिजामाता कन्या प्रशालेचा निकाल ९९.३० टक्के लागला आहे. १३ विद्यार्थिनींनी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतले आहेत. गुणवंतांचे कौतुक संस्थाध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, डॉ.पी.आर. देशमुख, ॲड. नारायणराव पाटील, ॲड. शहाजी मनाळे, विष्णुपंत गोरे, डॉ. शिवाजी सूर्यवंशी, डॉ. गितांजली पाटील, मुख्याध्यापिका अलका देशमुख, डॉ. सुवर्णा जाधव यांनी केले.

Web Title: .......... 10th Quality felicitation .............

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.