शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

100 शास्त्रज्ञ, 2 वर्षांची तयारी; भारताच्या 'शक्ती'शाली मिशनची इनसाईट स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 12:02 IST

भारताने बुधवारी अंतराळविश्वात धमाका करताना अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करण्याचे सामर्थ्य सिद्ध करणारी ‘मिशन शक्ती’ नावाने घेण्यात आलेली चाचणी यशस्वी करून दाखवली.

नवी दिल्ली -  भारताने बुधवारी अंतराळविश्वात धमाका करताना अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या अचूक माऱ्याने नष्ट करण्याचे सामर्थ्य सिद्ध करणारी ‘मिशन शक्ती’ नावाने घेण्यात आलेली चाचणी यशस्वी करून दाखवली. भारताच्यामिशन शक्तीच्या यशाची चर्चा जगभरात सुरू आहे. दरम्यान, मिशन शक्तीची पूर्वतयारी गेल्या दोन वर्षांपासून सुरू होती, गेल्या सहा महिन्यांपासून या मोहिमेच्या मिशन मोडवर काम सुरू होते. या मोहिमेच्या यशासाठी सुमारे 100 शास्त्रज्ञ काम करत होते, अशी माहिती डीआरडीओचे प्रमुख जी. एस. रेड्डी यांनी दिली आहे. एनएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये डीआरडीओच्या प्रमुखांनी मिशन शक्तीविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ''मिशन शक्तीच्या यशासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे 100 शास्त्रज्ञ सातत्याने काम करत होते. तसेच या मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या दिशेने वाटचाल करत होते. या मोहिमेची इत्यंभूत माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना देण्यात येत होती. तसेच डोवाल ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देत होते.''

''या मोहिमेसाठी खूप आधीच सुरुवात झाली होती. प्रत्यक्ष मोहिमेदरम्यान आम्ही आमच्या लक्ष्याला कायनेटिक किल म्हणजेच थेट उपग्रहालाच लक्ष्य केले. यासाठी विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाची मदत घेतली गेली. विशेष बाब म्हणजे या मोहिमेसाठी वापरण्यात आलेले सर्व तंत्रज्ञात हे भारतातच विकसित करण्यात आलेले होते. ते संपूर्ण पणे यशस्वी झाले.'' असेही डीआरडीओचे प्रमुख जी. एस. रेड्डी यांनी पुढे सांगितले. ''A-SAT हे क्षेपणास्त्र लो अर्थ ऑर्बिट मध्ये संचार करणाऱ्या LEO उपग्रहांना लक्ष्य करण्यास सक्षम आहे. आमच्याकडे यापेक्षा मोठे लक्ष्य भेदण्याचीसुद्ध क्षमता आहे. मात्र कुठल्याही देशाचे नुकसान करण्याची आमची इच्छा नसल्याने आम्ही सुरुवातील LEO लाच लक्ष्य करण्याचे ठरवले.''असेही रेड्डी यांनी पुढे स्पष्ट केले. 

 

दरम्यान, अंतराळात संचार करणाऱ्या उपग्रहांना लक्ष्य करण्याचे तंत्र विकसित करणारा भारत हा अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतरचा तिसरा देश ठरला आहे. जेव्हा चीनने अशा प्रकारची चाचणी घेतली होती. तेव्हा संपूर्ण जगाने त्याचा निषेध नोंदवला होता. मात्र भारताने केलेल्या या चाचणीनंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने फारसा विरोध केलेला नाही.   

 

टॅग्स :Mission Shaktiमिशन शक्तीIndiaभारतDRDOडीआरडीओ