शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

खराब दारूगोळ्यावरील पैशांतून १०० तोफा खरेदी झाल्या असत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 06:17 IST

सहा वर्षांत ९६० कोटी रुपये खर्च : संरक्षण मंत्रालयाला अंतर्गत अहवाल सादर

नवी दिल्ली : सरकारची मालकी असलेल्या ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाकडून गेल्या सहा वर्षांत खराब दर्जाचा दारूगोळा विकत घेण्यावर भारतीय लष्कराचा पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. या पैशांतून मध्यम पल्ल्याच्या १०० तोफा खरेदी करता आल्या असत्या, असा दावा संरक्षण मंत्रालयाला पाठविण्यात आलेल्या अंतर्गत अहवालात केला गेला आहे.

२०१४ ते २०२० दरम्यान आॅर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाने खराब दर्जाचा दारूगोळा पुरवला. त्यामुळे ९६० कोटी रुपयांचे नुकसान झाले. ९६० कोटी म्हणजे एवढ्या पैशांमध्ये १५५ एमएम रेंजच्या मध्यम पल्ल्याच्या १०० तोफा खरेदी करता आल्या असत्या, असे हा अहवाल म्हणतो.बोर्डाचे कामकाज संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागांतर्गत चालते. जगातील ही एक जुनी सरकारचे नियंत्रण असलेली उत्पादन संस्था आहे. देशात आॅर्डिनन्सच्या फॅक्टरी आहेत. भारतीय लष्करासाठी दारूगोळा आणि शस्त्रास्त्र निर्मितीचे काम या कारखान्यांत चालते. २३ एमएम एअर डिफेन्स शेल, आर्टिलरी शेल्स, १२५ एमएम टँक राऊंड आणि रायफल्समध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या गोळ्यांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत.जीवितहानीही होते...आॅर्डिनन्स फॅक्ट्रीने केलेल्या या खराब दर्जाच्या उत्पादनामुळे फक्त आर्थिक नुकसानच झाले नाही, तर दारूगोळ्याच्या सुमार दर्जामुळे जे अपघात झाले, त्यात जीवितहानीही झाल्याचे अहवालात नमूद आहे. ‘कोणावर जबाबदारी निश्चित करता येत नाही आणि खराब दर्जामुळे वारंवार अपघात घडतात. यामुळे सैनिक जखमी होतात, त्यांचा मृत्यू होतो. सरासरी दर आठवड्याला एक अपघात होतो’, असेही अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहDefenceसंरक्षण विभाग