शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक सरकारने पुन्हा महाराष्ट्राला डिवचले, सीमा विकास प्राधिकरणासाठी १०० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 07:18 IST

Maharashtra Vs Karnataka: कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणाला ३१ मार्चपूर्वी १०० कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा करून, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले आहे.

बंगळुरू : कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणाला ३१ मार्चपूर्वी १०० कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा करून, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले आहे. सीमा भागाला विकासाची नितांत गरज आहे. शिक्षण, उद्योग, पायाभूत सुविधा आणि कन्नडच्या प्रचारासाठी हा निधी दिल्याचे त्यांनी सांगितले.

या आघाड्यांवर कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. गुरुवारी येथे कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वतीने ‘गदीनादा चेतना’ हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, “आधीच प्राधिकरणाला २५ कोटी रुपये देण्यात आले आहेत आणि आणखी १०० कोटींची तरतूद पुढील अर्थसंकल्पात केली जाईल. सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांचे प्रश्नही सोडवले पाहिजेत आणि सीमेपलीकडे राहणाऱ्या कन्नडिगांचे प्रश्नही सोडवले पाहिजेत.”

वादावर म्हणाले...कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले की जेव्हा जेव्हा भाषिक धर्तीवर प्रदेश तयार केले जातात तेव्हा मतभेद वाढतात. मात्र, सर्व मतभेद विसरून सौहार्दपूर्ण जगणे महत्त्वाचे आहे. सीमाभागातील अनेक कन्नडिगांसाठी मात्र तसे झाले नाही. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. चंद्रशेखर कंबार, कर्नाटक सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सी. सोमशेकर उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकPoliticsराजकारण