शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांत ‘ईडी’कडून १०० कोटी जप्त; नोटांचे पुढे काय होते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 08:05 IST

मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई येथील काही उद्योजक तसेच क्रिप्टो करन्सी कंपन्यांवरील कारवाईदरम्यानदेखील एकूण १३ कोटी रुपयांच्या आसपास रोख रक्कम ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे

मुंबई : मागील तीन महिन्यांत देशातील विविध भागांत ईडीने (सक्तवसुली संचालनालय) केलेल्या छापेमारीत १०० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, छापेमारीवेळी रोख रक्कम आढळण्याचे प्रमाण वाढताना दिसत असल्याच्या पार्श्वभूमीवर ईडीच्या देशातील काही प्रमुख कार्यालयांतून आता नोटा मोजण्याचे मशिन्स बसविण्यात आली आहेत. जप्त रक्कम मोजण्यासाठी आठ बँक अधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांत देशभरात ईडीच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यांत सर्वांत मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम पश्चिम बंगाल येथे झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपींच्या घर तसेच कार्यालयातून जप्त झालेली आहे. पश्चिम बंगाल येथील निलंबित मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्याकडून तब्बल ५० कोटी रुपयांची रोख रक्कम ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली. 

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यानंतर कोलकाता येथे गेल्या आठवड्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी एका मोबाईल गेमिंग कंपनीच्या संचालकावर केलेल्या छापेमारीत त्याच्या घरातील पलंगाखाली तब्बल १७ कोटी रुपयांची रोख रक्कम आढळून आली होती, तर झारखंड येथील एका खनिकर्म उद्योगातील कंपनीवर झालेल्या छापेमारीत २० कोटी मिळाले होते. 

मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई येथील काही उद्योजक तसेच क्रिप्टो करन्सी कंपन्यांवरील कारवाईदरम्यानदेखील एकूण १३ कोटी रुपयांच्या आसपास रोख रक्कम ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. छापेमारीदरम्यान मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम मिळत असल्यामुळे आता ईडीच्या काही प्रमुख विभागीय कार्यालयांतून नोटा मोजण्याची मशीन्स बसविण्यात आली आहेत, तर नियमाप्रमाणे नोटा मोजणी ही बँकेच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष होणे गरजेचे असल्यामुळे आठ बँक अधिकाऱ्यांचीदेखील नेमणूक ईडीने केल्याचे समजते.

जप्त नोटांचे काय होते?

छापेमारीदरम्यान जर रोख रक्कम ईडीच्या अधिकाऱ्यांना आढळली तर बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांची मोजणी केली जाते. विशिष्ट फॉर्मवर या नोटांचे नंबर आणि कोणत्या चलनातील नोटा आहेत, याची नोंद केली जाते. त्यानंतर या नोटा स्टेट बँकेमध्ये जमा केल्या जातात. या नोटा जमा केल्यानंतर तपासादरम्यान ज्या व्यक्तीकडून या नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत, त्या व्यक्तीला पैशांचा स्रोत तसेच हिशेब विचारला जातो. जर त्या व्यक्तीने रोख रकमेचा योग्य हिशेब दिला आणि तो ईडीच्या अधिकाऱ्यांना योग्य असल्याचे दिसून आले तर न्यायालयाच्या निरीक्षणाखाली आणि योग्य ती प्रक्रिया पार पाडून ती रक्कम संबंधित व्यक्तीस परत केली जाते.

 

 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय