100 कोटींच्या प्रकल्पांची चर्चा
By Admin | Updated: July 11, 2014 02:27 IST2014-07-11T02:27:19+5:302014-07-11T02:27:19+5:30
आपल्या किमान डझनभर योजनांसाठी 1क्क् कोटी रुपयांचीच तरतूद का केली यामागच्या कारणांचे स्पष्टीकरणही जेटली यांनी दिले आहे.

100 कोटींच्या प्रकल्पांची चर्चा
दोन डझन योजना : योजना मालिकेवर अनेक मंत्र्यांचे स्मितहास्य
हरीश गुप्ता
आपल्या किमान डझनभर योजनांसाठी 1क्क् कोटी रुपयांचीच तरतूद का केली यामागच्या कारणांचे स्पष्टीकरणही जेटली यांनी दिले आहे. ते म्हणाले, ‘यातील प्रत्येक योजना हा एक मोठा प्रकल्प आहे. सरकारच्या हातचे चार महिने आधीच निघून गेलेले आहेत.
संसद आणि संसदेच्या बाहेर गुरुवारी वित्तमंत्री अरुण जेटली यांचे 1क्क् कोटी रुपयांच्या जादुई आकडय़ावरील प्रेम सर्वाच्याच चर्चेचा विषय ठरले होते. जेटली यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना जवळपास दोन डझन योजनांसाठी प्रत्येकी
1क्क् कोटी रुपयांची तरतूद
करण्यात आल्याचे सांगितले तेव्हा त्यांच्या या ‘1क्क् कोटींच्या योजना मालिके’वर अनेक मंत्र्यांनी स्मित हास्य केले.
जेटली प्रत्येक परिच्छेदानंतर ‘या योजनेसाठी 1क्क् कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे,’ असे म्हणत होते. त्यांनी यंग लीडर्स प्रोग्रामपासून तर राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर्पयतच्या कार्यक्रमांसाठी 1क्क् कोटी रुपयांचीच तरतूूद केली. त्यांनी हिमालय अभ्यास केंद्रासाठी उत्तराखंडला 1क्क् कोटी रुपये दिले तसेच सेंद्रिय शेतीसाठी ईशान्येकडील राज्यांनाही 1क्क् कोटीच दिले. जेटलींच्या या 1क्क् कोटी रुपयांच्या आकडय़ावरील प्रेमाने टि¦टर आणि फेसबुक जाम झाले होते.
आपल्या किमान डझनभर योजनांसाठी 1क्क् कोटी रुपयांचीच तरतूद का केली यामागच्या कारणांचे स्पष्टीकरणही जेटली यांनी दिले आहे. ते म्हणाले, ‘यातील प्रत्येक योजना हा एक मोठा प्रकल्प आहे. सरकारच्या हातचे चार महिने आधीच निघून गेलेले आहेत आणि पुढचे चार महिने मंत्रलये आणि राज्य सरकारांद्वारे नियोजन करण्यात जाणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पांवर निधी खर्च करण्यासाठी केवळ चार महिने बाकी आहेत. हे प्रकल्प एकदा सुरू झाले की मग पुढच्या वित्त वर्षात त्यांच्यासाठी आणखी निधी वितरित करता येईल.’
काय आहेत योजना?
मदरशांचे आधुनिकीकरण, यंग लीडर्स प्रोग्राम, मणिपुरात क्रीडा विद्यापीठ, पुरातत्वीय स्थळांचा विकास, राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर, अहमदाबाद आणि लखनौ येथे मेट्रो प्रकल्प, ग्रामीण युवकांसाठी ‘स्टार्ट अप’ कार्यक्रम, महिला कल्याणासाठी ‘बेटी बचावो, बेटी पढावो’ योजना, राष्ट्रकुल आणि आशियन क्रीडा स्पर्धासाठी क्रीडापटूंना प्रशिक्षण, कृषी पायाभूत सुविधा निधी, नदी काठाचा विकास आणि सौंदर्यीकरण, तंत्रज्ञान विकास निधीचा विकास, प्रिंस पार्क येथे युद्ध स्मारक आणि युद्ध संग्रहालय, आदिवासींसाठी वनबंधू कल्याण योजना, ईशान्येकडील राज्यांमध्ये सेंद्रिय शेती, हवामान बदलासाठी राष्ट्रीय अनुकुलन निधी, हिमालयाचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय केंद्र आणि आभासी वर्गखोल्या.
जेटली आणि पिवळा रंग
अर्थमंत्री अरुण जेटली हे जेव्हा लोकसभेत अर्थसंकल्प सादर करीत होते तेव्हा त्यांनी पिवळ्य़ा रंगांची वे घालण्यास प्राधान्य दिला असल्याची नोंद सर्वानी घेतली. हिंदू पौराणिक संदर्भानुसार गुरुवारचा दिवस हा गुरूला समर्पित असतो. त्यामुळे त्यांचे अनुयायी पिवळ्य़ा रंगाची वे धारण करतात व पिवळ्य़ा रंगाची फुले त्यांना वाहतात.