शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

चित्रपटगृह, नाट्यगृहांमध्ये आजपासून 100 टक्के प्रेक्षक, केंद्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 07:38 IST

कोरोना साथीच्या काळात केंद्र सरकारने नुकतीच नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यानुसार चित्रपट व नाट्यगृहांमध्ये १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली. याआधी फक्त ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेशाची परवानगी देण्यात आली होती.

नवी दिल्ली : देशभरातील चित्रपट, नाट्यगृहांमध्ये १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यास केंद्र सरकारने उद्या, १ फेब्रुवारीपासून परवानगी दिली आहे. मध्यंतरीच्या काळात चित्रपट, नाट्यगृहांचे उत्पन्न खालावले होते ते वाढण्यास या निर्णयामुळे आता मोठी मदत होणार आहे.कोरोना साथीच्या काळात केंद्र सरकारने नुकतीच नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. त्यानुसार चित्रपट व नाट्यगृहांमध्ये १०० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली. याआधी फक्त ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेशाची परवानगी देण्यात आली होती.चित्रपटगृहे, नाट्यगृहांमध्ये प्रेक्षकांनी फिजिकल डिस्टन्सिंग  राखावे तसेच तोंडावर मास्क लावावे, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना साथीमुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केल्यानंतर देशभरातील हजारो चित्रपटगृहे व नाट्यगृहे बंद झाली. त्यामुळे चित्रपटांचा व नाटकांचाही व्यवसाय खूपच मंदावला होता. ऑक्टोबर महिन्यामध्ये पुन्हा चित्रपटगृहे, नाट्यगृहे उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. मात्र, सभागृह क्षमतेच्या फक्त ५० टक्के लोकांनाच प्रवेश देण्याची परवानगी देण्यात आली होती.ऑनलाइन तिकीट बुकिंगवर भर कोरोना साथीच्या फैलावाचे प्रमाणही देशात बरेच कमी झाले आहे. चित्रपट व नाट्यगृहे पूर्वीसारखी चालावीत म्हणून त्यांच्या संचालकांनीही चित्रपट, नाटकाचे खेळ कमी केले आहेत. प्रेक्षकांना सर्व नियम पाळण्यास सांगितले जाते व तिकीट बुकिंग ऑनलाइन पद्धतीने करण्यावर भर देण्यात आला. 

दुसऱ्या टप्प्याची पूर्वतयारी सुरूदुसऱ्या टप्प्यात ५० वर्षे वयावरील तसेच ५० वर्षे वयाखालील असलेल्या व ज्यांना एकाहून अधिक व्याधींचा त्रास आहे अशा लोकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. या टप्प्याचीही पूर्वतयारी केंद्राने सुरू केली आहे. लसीकरण मोहिमेसाठी कोविन हे अ‍ॅप वापरण्यात येत आहे. इच्छुकांनी नावाची नोंदणी कोविन अ‍ॅपवर करायची आहे. 

देशातील कोरोना योद्ध्यांचे  आजपासून होणार लसीकरण नवी दिल्ली : कोरोना  लसीकरण मोहिमेत आरोग्य  सेवकांबरोबर आता उद्या,  १ फेब्रुवारीपासून कोरोना योद्ध्यांनाही ही लस देण्यात येणार आहे. कोरोना योद्ध्यांमध्ये स्वच्छता कर्मचारी, पोलीस, निमलष्करी दलाचे जवान, होमगार्ड, आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात काम करणारे कर्मचारी व नागरी संरक्षण दलांतील जवान यांचा समावेश आहे. स्वच्छता कर्मचारी, पोलीस, निमलष्करी जवान आदींचा समावेश  भारत ६० देशांना पुरवणार लसीचे १६ कोटी डोसनवी दिल्ली : सुमारे ६० देश व युनिसेफला भारतात बनलेल्या दोन कोरोना प्रतिबंधक लसींच्या १६ कोटींहून अधिक डोसचा पुरवठा करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. कोरोना काळात भारत हा जगासाठी लस व औषधांचे मुख्य पुरवठा केंद्र बनला आहे. बळींच्या संख्येत लक्षणीय घटदेशभरात कोरोनामुळे दररोज नोंंदल्या जाणाऱ्या बळींच्या संख्येत लक्षणीय घट झाली असून, रविवारी १२७ जणांचा मृत्यू झाला. तर बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९६.९९ टक्के झाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcinemaसिनेमाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक