लोकमत न्यूज नेटवर्क, भद्रवाह: जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात सुरक्षा दलाचे वाहन खोल दरीत कोसळल्याने गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात १० जवान शहीद, तर ११ जण जखमी झाले. ९ हजार फूट उंचीवरील भदरवाह-चंबा आंतरराज्यीय मार्गावरील खन्नी टॉपजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
सुरक्षा दलाचे बुलेटप्रूफ लष्करी वाहन जवानांना घेऊन दहशतवादविरोधी अभियानासाठी जात होते. यादरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित वाहन खन्नी टॉप येथील २०० फूट खोल दरीत कोसळल्याने ही दुर्घटना घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, बुलेटप्रूफ वाहनाचा चुराडा झाला. सुरक्षा दल व पोलिसांनी संयुक्तरीत्या बचाव अभियान राबवत चार जवानांचे मृतदेह व जखमी जवानांना दरीतून बाहेर काढले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर आणखी सहा जवानांचा मृत्यू झाला.
जखमी हा जवानांना अधिक उपचारासाठी उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात एअरलिफ्ट केले आहे. एकावर भद्रवाह येथे उपचार सुरू आहेत.
शोक व्यक्त
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी शहीद जवानांबद्दल शोक व्यक्त करत जखमींनी लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना केली.
Web Summary : In Jammu-Kashmir's Doda, a vehicle fell into a gorge, killing 10 soldiers and injuring 11. The vehicle, en route for counter-terrorism operations, lost control near Khanni Top. The accident was severe, resulting in the vehicle being completely destroyed. Rescue operations were conducted, and injured soldiers were airlifted for treatment.
Web Summary : जम्मू-कश्मीर के डोडा में एक वाहन के खाई में गिरने से 10 जवान शहीद हो गए और 11 घायल हो गए। आतंकवाद विरोधी अभियानों के लिए जा रहा वाहन खन्नी टॉप के पास नियंत्रण खो बैठा। दुर्घटना इतनी गंभीर थी कि वाहन पूरी तरह से नष्ट हो गया। बचाव अभियान चलाया गया, और घायल सैनिकों को इलाज के लिए एयरलिफ्ट किया गया।