शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

१० टक्के राखीव जागांमुळे सध्याच्या आरक्षणावर परिणाम नाही - मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 04:44 IST

सवर्णांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलेल्या १० टक्के राखीव जागांचा दलित, आदिवासी, अन्य मागासवर्गीय यांच्यासाठी असलेल्या सध्याच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

मदुराई : सवर्णांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलेल्या १० टक्के राखीव जागांचा दलित, आदिवासी, अन्य मागासवर्गीय यांच्यासाठी असलेल्या सध्याच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.येथील एका सभेत मोदी म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्यावरून तामिळनाडूतील काही जण स्वत:च्या स्वार्थासाठी संशयाचे वातावरण निर्माण करीत आहेत. समाजातील सर्व वर्गांतील लोकांना शिक्षणाची संधी व रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी १० टक्के राखीव जागांचा निर्णय घेण्यात आला. तामिळनाडूतील द्रमुक व अन्य काही पक्षांनी १० टक्के राखीव जागांच्या निर्णयाला विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात द्रमुकने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सामाजिक मागासलेपण हा राखीव जागांसाठी एकमात्र निकष असावा, अशी मागणी या पक्षांनी केली आहे.ते म्हणाले की, देशातील भ्रष्टाचार संपविण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले उचलली आहेत. आर्थिक घोटाळे करणारे भलेही विदेशात लपून बसले असतील, त्यांना तेथून जेरबंद करून भारतात आणू. तामिळनाडू येथील तोप्पूर येथे बांधण्यात येणाऱ्या एम्स रुग्णालय प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ मोदी यांच्या हस्ते रविवारी पार पडला. त्या कार्यक्रमात ते म्हणाले की, सर्व नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून आयुष्मान योजना राबविण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)एमडीएमकेची निदर्शनेकावेरी व अन्य प्रश्नांवरून मोदी यांनी तामिळनाडूची फसवणूक केल्याचा आरोप करीत त्यांना एमडीएमके पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदुराई येथे काळे झेंडे दाखविले. या पक्षाचे प्रमुख वायको यांनी सांगितले की, केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या न्यूट्रिनो व हायड्रोकार्बन प्रकल्पांमुळे तामिळनाडूतील शेतकºयांची रोजीरोटीच जाणार आहे. कावेरी प्रश्नी मोदी सरकार कर्नाटकच्या फायद्याची भूमिका घेत आहे, असाही आरोप त्यांनी केला.

टॅग्स :reservationआरक्षणNarendra Modiनरेंद्र मोदी