१०... नरखेड... अपघात

By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:17+5:302015-02-11T00:33:17+5:30

(फोटो)

10 ... Narkhad ... accident | १०... नरखेड... अपघात

१०... नरखेड... अपघात

(फ
ोटो)
बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
नरखेड येथील घटना : बसचालकास अटक
नरखेड : भरधाव एसटी बसने सकाळी रोडच्या कडेला व्यायाम करीत असलेल्या तरुणाला उडविले. यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना नरखेड -मोवाड मार्गावर मंगळवारी सकाळी घडली.
मोहन पुंडलिक झाडे (२३, रा. नरखेड) असे मृत तरुणाचे नाव आहे. मोहन हा रोज सकाळी नरखेड - मोवाड मार्गावर धावण्यासाठी तसेच व्यायाम करण्यासाठी जायचा. तो नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी या मार्गावर व्यायाम करण्यासाठी गेला होता. दरम्यान, चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी महामंडळाच्या नरखेडहून मोवाडकडे जाणाऱ्या एमएच-४०/८६०१ क्रमांकाच्या भरधाव बसने त्याला उडविले. यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच नरखेड पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मोहनचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. तसेच बसचालक प्रदीप हवजे रा. काटोल यास ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणी नरखेड पोलिसांनी भादंवि २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला असून, सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दीपक गोतमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय शेंडे, नागूलवार, भजने करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
***

Web Title: 10 ... Narkhad ... accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.