१०... नांद ... वेकोलि... जोड
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:34+5:302015-02-11T00:33:34+5:30
------चौकट------

१०... नांद ... वेकोलि... जोड
---- --चौकट------असा आहे मोबदलागोकुल कोळसा परियोजनेंतर्गत भिवापूर तालुक्यातील पिरावा व सुकळी परिसरातील ६१६ शेतकऱ्यांची एकूण ७५६ हेक्टर जमीन खाणीसाठी अधिग्रहित करण्यात आली. योग्य मोबदला मिळावा, यासाठी प्रकल्पग्रस्तांचा पाच वर्षापासून लढा सुरू होता. सततच्या पाठपुराव्याची दखल घेत शासनाने मोबदला जाहीर केला. यात प्रकल्पग्रस्तांना ओलिताच्या शेतीसाठी प्रति एकरी दहा लाख रुपये, कोरडवाहू शेतीसाठी प्रति एकरी आठ लाख रुपये आणि पडित जमिनीसाठी प्रति एकरी सहा लाख रुपये मोबदला जाहीर केला. त्याअनुषंगाने पिरावा व सुकळी परिसरातील प्रकल्पग्रस्तांसाठी एकूण १५९ कोटी रुपये जाहीर करण्यात आले. शिवाय, ५६३ तरुणांना नोकरी किंवा अतिरिक्त प्रत्येकी पाच लाख रुपयेही जाहीर करण्यात आले. ***