१० गाईंना जीवनदान

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:09+5:302015-08-02T22:55:09+5:30

१० गाईंना जीवनदान

10 Lives of cows | १० गाईंना जीवनदान

१० गाईंना जीवनदान

गाईंना जीवनदान
आरोपीस अटक : पावने तीन लाखांचा ऐवज जप्त
मौदा : अवैध जनावरांची वाहतूक करणारा पिकअप मालवाहू वाहन अरोली पोलिसांनी पकडले. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून १० गाईंना जीवनदान दिले.
अरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अडेगाव फाटा शिवारात पोलीस गस्तीवर असताना एमएच-४०/४१५८ क्रमांकाच्या पिकअप मालवाहू वाहनात १० गाईंना निर्दयतेने कोंबून आरोपी चालक विनापरवाना वाहतूक करीत असल्याचे पोलिसांना आढळले. सदर पिकअप वाहनातील ८० हजार रुपये किमतीच्या १० गाई व दोन लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा एकूण २ लाख ८० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी अरोली पोलिसांनी आरोपी वाहनचालकाविरुद्ध कलम ११ अ,ड,न प्राण्यांना निर्दयतेने वागणूक कायदा १९६० अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल रामटेके करीत आहे. (प्रतिनिधी)
....
गुमथी येथे घरफोडी
खापरखेडा : खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमथळा गुमथी शिवारात अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.
फिर्यादी मोहम्मद अशरफ मो. उमर अली (५०, रा. नागपूर) यांनी आपला फार्म हाऊस बंद करुन ठेवले होते. दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या फार्म हाऊसचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. फार्म हाऊसमधील गाद्या, रॅक, गंज, रंगीत टीव्ही, ब्लॅकेट असा एकूण ५९०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने पळविला. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला असून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास सहायक फौजदार कुराडे करीत आहेत. (प्रतिनिधी)
....
पानठेल्यातील साहित्य लंपास
नागपूर : हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा टाऊन येथे अज्ञात चोरट्याने पानठेल्यातील साहित्य लंपास केले. ही घटना शुक्रवार ते शनिवारी मध्यरात्रीदरम्यान घडली. फिर्यादी साजीद मज्जीद कुरैशी (२९, रा. रायपूर, हिंगणा) यांचा हिंगणा येथे पानठेला आहे. दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या पानठेल्याचे कुलूप तोडून पानठेल्यातील १३ हजार १५० रुपये किमतीचे विविध साहित्य पळविले. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन हिंगणा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. पुढील तपास सहायक फौजदार पाटील करीत आहे.

Web Title: 10 Lives of cows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.