मीरवाइजची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस

By Admin | Updated: June 23, 2017 18:29 IST2017-06-23T16:49:50+5:302017-06-23T18:29:12+5:30

जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेते मीरवाइज उमर फारुख यांची जीभ कापणा-यास मध्य प्रदेशच्या एका भाजपा नेत्याने 10 लाख रूपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे.

10 lakhs prize for making Mirwais' tongue alive | मीरवाइजची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस

मीरवाइजची जीभ कापणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस

ऑनलाइन लोकमत
भिंड(मध्य प्रदेश), दि. 23 - जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेते मीरवाइज उमर फारुख यांची जीभ कापणा-यास मध्य प्रदेशच्या एका भाजपा नेत्याने 10 लाख रूपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केल्यानंतर मीरवाइजने  पाकिस्तानी क्रिकेट संघाचं अभिनंदन करताना जल्लोष केला होता. गजराज जाटव असं 10 लाख रूपयांच्या बक्षिसाची घोषणा करणा-या भाजपा नेत्याचं नाव आहे. 
 
त्यापुर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्यफेरीत पाकिस्तानच्या संघाने  इंग्लंडवर विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतरही मीरवाइज उमर फारुख यांनी टि्वट करुन पाकिस्तानला शुभेच्छा दिल्या होत्या.  
 
10 लाख रूपयांच्या बक्षिसाची घोषणा करताना जाटव म्हणाले, मीरवाइजच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह या देशाच्या मातीतच दफन केला जाणार आहे. तरीही ते पाकिस्तानचे कौतुक करत आहेत. तसंच आपल्या धर्मातील इतर लोकांचीही ते दिशाभूल करत आहेत, या लोकांनी माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून काही तरी शिकायला हवे. कलाम यांनी नेहमी भारताच्या हिताचाच विचार केला. मीरवाइजच्या कृत्यामुळे माझ्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, स्वातंत्र्यानंतर जे मुस्लिम पाकिस्तानात गेले आहेत. त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते असंही जाटव म्हणाले. 
 
 

Web Title: 10 lakhs prize for making Mirwais' tongue alive