‘10 लाख प्रकरणांचा यंदा निपटारा व्हावा’
By Admin | Updated: December 6, 2014 23:51 IST2014-12-06T23:51:46+5:302014-12-06T23:51:46+5:30
देशभरात आयोजित करण्यात येत असलेल्या लोकअदालती यावर्षी किमान दहा लाख प्रकरणांचा निपटारा करण्यास मदत करतील, अशी आशा सरन्यायाधीश एम.एल. दत्तू यांनी व्यक्त केली आहे.

‘10 लाख प्रकरणांचा यंदा निपटारा व्हावा’
नवी दिल्ली : देशभरात आयोजित करण्यात येत असलेल्या लोकअदालती यावर्षी किमान दहा लाख प्रकरणांचा निपटारा करण्यास मदत करतील, अशी आशा सरन्यायाधीश एम.एल. दत्तू यांनी व्यक्त केली आहे.
हैदराबाद येथील उच्च न्यायालय परिसरात तेलंगण आणि आंध्र प्रदेशसाठी लोकअदालतचे उद्घाटन करताना न्या. दत्तू बोलत होते. सर्व स्तरांवरील लोकअदालतच्या पीठासीन अधिका:यांनी पक्षकारांवर समझोत्यासाठी दबाव आणू नये, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
न्या. दत्तू पुढे म्हणाले की, ‘मागच्या वर्षी आम्ही आमच्या प्रयत्नात यशस्वी राहिलो. देशभरात आम्ही दहा लाखांवरचा आकडा पार केला. यावर्षीदेखील दहा लाख प्रकरणांचा निपटारा करण्याचे मोठे लक्ष्य प्राप्त करायचे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)