मध्य प्रदेशात वीज कोसळून १० ठार

By Admin | Updated: June 14, 2015 23:59 IST2015-06-14T23:59:42+5:302015-06-14T23:59:42+5:30

मध्य प्रदेशात गत २४ तासांत वीज कोसळून १० जणांचा मृत्यू झाला तर अन्य ६ जखमी झाले. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे.

10 killed in electricity in Madhya Pradesh | मध्य प्रदेशात वीज कोसळून १० ठार

मध्य प्रदेशात वीज कोसळून १० ठार

भोपाळ : मध्य प्रदेशात गत २४ तासांत वीज कोसळून १० जणांचा मृत्यू झाला तर अन्य ६ जखमी झाले. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे.
शनिवारी छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा, सौंसर, बिछुआ आणि परासिया भागात वीज पडल्याच्या चार घटनांमध्ये सहा जण ठार झाले तर चार जण जखमी झाले. सिवनी जिल्ह्याच्या लुटमारा गावात दोन बहीण-भाऊ मृत्युमुखी पडले. अलीपुरा जिल्ह्याच्या जोबट येथेही अशाच एका घटनेत एक महिला मृत्युमुखी पडली. हरदा जिल्ह्यातील गोदडी गावातही शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या तडाख्यात सापडून मृत्यू झाला.

Web Title: 10 killed in electricity in Madhya Pradesh