तामिळनाडूमध्ये बस अपघातात १० ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2016 13:05 IST2016-01-08T13:05:29+5:302016-01-08T13:05:51+5:30
तामिळनाडूतील तिरनेलवेल्ली येथे बस उलटून झालेल्या अपघातात १० प्रवासी मृत्यूमुखी पडले

तामिळनाडूमध्ये बस अपघातात १० ठार
>ऑनलाइन लोकमत
तिरुनेलवेल्ली, दि. ८ - तामिळनाडूतील तिरनेलवेल्ली येथे बस उलटून झालेल्या अपघातात १० प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. ही बस पुद्दुचेरी येथून केरळच्या दिशने जात असताना बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
अपघातात १० जण ठार झाले असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत, त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.