१०.... कामठी... मांस

By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:18+5:302015-02-11T00:33:18+5:30

साडेनऊ टन मांस जप्त

10 .... Kamathi ... meat | १०.... कामठी... मांस

१०.... कामठी... मांस

डेनऊ टन मांस जप्त
एकास अटक : कामठीत काही काळ तणाव
कामठी : कामठीतील कत्तलखान्यातून मुंबईकडे जनावरांचे मांस घेऊन जाणारा ट्रक कामठी पोलिसांनी पकडला. हा ट्रक सोडून देण्यासाठी काही तरुणांनी हस्तक्षेप केल्याने स्थानिक बसस्थानक चौकात काही काळ तणाव निर्माण झाला होता. ही कारवाई सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आजनी रेल्वे फाटकाजवळ करण्यात आली असून, त्यात जनावरांचे साडेनऊ टन मांस जप्त करण्यात आले. शिवाय, एकास अटक करण्यात आली.
सारिक तवक्कल खान (३४, रा. पिली हवेली, कामठी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सारिक तवक्कल खान हा एमएच-४०/वाय-१६७९ क्रमांकाच्या ट्रकमध्ये जनावरांचे मांस घेऊन कामठीहून मुंबईकडे जात असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक किरण पावसे यांना मिळाली होती. हा ट्रक कामठी शहरातील भाजी मंडी परिसरातून निघाला होता. सदर ट्रक त्यांच्या नजरेस पडताच त्यांनी त्या ट्रकचा पाठलाग करायला सुरुवात केली. पावसे यांच्या पथकाने हा ट्रक आजनी शिवारातील रेल्वे फाटकाजवळ अडविला आणि त्याची कसून तपासणी केली. त्यात जनावरांचे मांस असल्याचे त्यांना आढळून आले. तसेच सदर मांसाची वाहतूक ही अवैध असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. या कारवाईमध्ये १० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
मांस वाहतुकीचा ट्रक पोलिसांनी पकडल्याचे कळताच कामठी शहरातील अंदाजे ३० तरुण घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सदर ट्रक कारवाईिवना सोडूून देण्याची मागणी केली. पावसे यांनी नकार दिल्याने तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर बळजबरीने ट्रक पळवून नेण्याचा प्रयत्नही केला.
थोड्याच वेळात रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास जवळपास १०० तरुण कामठी शहरातील बसस्थानक चौकात गोळा झाले. त्यांनीही पोलिसांच्या या कारवाईचा विरोध केला. दरम्यान, पोलिसांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. यातील काहींनी रोडवरील हॉटेल बंद करायला लावली तर काहींनी रोडवर लावलेले बॅरेकेटस् तोडले.

Web Title: 10 .... Kamathi ... meat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.