शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील तब्बल 10 कैदी आढळले HIV संक्रमित; जिल्ह्यात माजली खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 13:05 IST

जिल्हा कारागृहातील 10 कैदी एकाचवेळी एचआयव्ही संक्रमित आढळल्याची घटना समोर आली आहे.

आझमगड : उत्तर प्रदेशमधील आझमगड जिल्हा कारागृहातील 10 कैदी एकाचवेळी एचआयव्ही संक्रमित (HIV Positive) आढळले आहेत. हे सर्व कैदी आझमगड जिल्ह्यातील इटौरा येथील जिल्हा कारागृहात आहेत. ही घटना उघडकीस येताच इतर कैद्यांच्या तपासाची प्रक्रिया सुरू झाली आहे. आरोग्य विभागाने त्याचा अहवाल कारागृह प्रशासन आणि सरकारला दिला आहे. कारागृहातील कैदी एचआयव्ही संक्रमित आढळल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. तसेच कारागृह प्रशासन या कैद्यांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, आझमगड जिल्ह्यातील इटौरा येथे बांधण्यात आलेल्या नवीन हायटेक जेलमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार कैद्यांची एचआयव्ही चाचणी केली जात आहे. यामाध्यमातून किती कैदी एचआयव्ही बाधित आहेत याची माहिती घेतली जात आहे. सध्या कारागृहात एकूण 2,500 कैदी असून यामध्ये पुरुष आणि महिला कैद्यांचा समावेश आहे. कारागृहात सुरू असलेल्या एचआयव्ही चाचणी प्रक्रियेत कैदी सहभागी होण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत निम्म्या कैद्यांची चाचणी झाली आहे, ज्यामध्ये एकूण 10 कैदी HIV बाधित आढळून आले आहेत. आतापर्यंत कोणत्याही महिला कैद्याबाबत स्पष्ट अहवाल समोर आलेला नाही.

1,322 कैद्यांची झाली तपासणी आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 2,500 कैद्यांपैकी एकूण 1,322 कैद्यांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये 10 जण संक्रमित आढळले आहेत. 5 कैद्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे तर 5 कैद्यांना कन्फर्मेशन चाचणीसाठी दुसऱ्यांदा पाठवण्यात आले आहे. कारागृह प्रशासन त्यांच्या अहवालाची वाट पाहत आहे. सध्या कारागृह प्रशासनात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

जिल्ह्यात माजली खळबळ न्यायालयाच्या आदेशानुसार कैद्यांची एचआयव्ही चाचणी करण्यात येत असल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.आय.एन तिवारी यांनी सांगितले. आतापर्यंत एकूण 10 कैद्यांची एचआयव्ही पॉझिटिव्ह आली आहे. या कैद्यांना सामान्य कैद्यांप्रमाणे ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना विषाणूनुसार औषधे दिली जात आहेत. कैद्यांना इतर काही समस्या असल्यास त्यांच्यावर त्यानुसार उपचार केले जातील. एचआयव्हीचे दोन प्रकार आहेत. हे एकतर संक्रमित रक्त संक्रमणाने किंवा असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे होऊ शकते. अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशHIV-AIDSएड्सjailतुरुंगazamgarh-pcआझमगढ