१०... मौदा... अपघात
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:18+5:302015-02-11T00:33:18+5:30
(फोटो)

१०... मौदा... अपघात
(फ ोटो)अपघातात सात जण जखमीभरधाव टाटासुमो उलटली : मौदा शिवारातील घटनामौदा/तारसा : डुक्कर आडवे आल्याने चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव टाटासुमो उलटली. या अपघातात सात जण जखमी झाले. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौदा - रामटेक मार्गावरील मौदा नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.दीपक शहा, ए. के. मिश्रा (३६), अमोल गजभिये, गौरव बोपचे (२७), राजीव रंजन, वीरेंद्र सिंह (५२) व प्रमोद पाठक सर्व रा. मौदा अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत. हे सर्व जण मौदा येथील एनटीपीसीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पात नोकरी करतात. ते नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी एमएच-३१/सीआर-०५४१ क्रमांकाच्या टाटासुमोने घरून कार्यालयात कामावर जात होते. सदर वाहन खासगी असले तरी ते एनटीपीसीने कर्मचाऱ्यांची ने -आण करण्यासाठी किरायाने घेतले आहे. दरम्यान, मौदा - रामटेक मार्गावरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ या भरधाव टाटा सुमोला डुक्कर आडवे गेले. त्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि टाटासुमो उलटली. वाहन वेगात असल्याने ते उलटल्यानंतर विरुद्ध दिशेने फिरले होते. त्यात सात जण जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी सर्व जखमींना मौदा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. जखमींपैकी पाच जणांवर उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली असून, अन्य दोघांना पुढील उपचारासाठी नागपूरला रवाना करण्यात आले. या मार्गावर डुकरांचा वावर चांगला वाढला आहे. सदर डुकरे भरधाव वाहनांना आडवे जात असल्याने अपघात होत आहेत. याच मार्गावर चार दिवसांपूर्वी डुक्कर आडवे गेल्याने दुचाकीचालक जखमी झाला. त्यामुळे स्थानिक प्र्रशासनाने या डुकरांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी वाहनचखलकांनी केली आहे. या प्रकरणी मौदा नोंद करून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी/वार्ताहर)***