शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बापरे... आधार लिंक करण्याच्या नावाखाली 10 कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 11:37 IST

आधार लिंक करण्याच्या नावाखाली काही महाभागांनी 1 हजारांहून अधिक जणांना 10 कोटींचा गंडा घातला आहे.

नवी दिल्लीः आधार लिंक करण्याच्या नावाखाली काही महाभागांनी 1 हजारांहून अधिक जणांना 10 कोटींचा गंडा घातला आहे. दिल्ली पोलिसांनी या चोरांच्या टोळक्यांचा पर्दाफाश केला आहे. या भामट्यांनी आतापर्यंत 1 हजारांहून अधिक वयोवृद्धांना 10 कोटींनी अधिकच्या रकमेचा गंडा घातला आहे. बँक अकाऊंट किंवा फोन नंबरला आधारशी लिंक करण्याच्या नावाखाली हे भामटे वयोवृद्धांची फसवणूक करून बँक खाते आणि इतर दस्तावेजांच्या माहिती मिळवत होते. त्यानंतर गरिबांना पैसे देऊन त्यांच्याकडून कागदपत्र घेऊन नवी खाती उघडत होते, या नव्या खात्यांमध्ये त्या वयोवृद्धांचे पैसे ट्रान्सफर करून लोकांना गंडा घालण्याचा धंदा सुरूच होता.पोलिसांनी बँकांमध्ये चौकशी करून कशा प्रकारच्या 1100 खात्यांचा शोध घेतला आहे. या भामट्याचं जाळं राजधानीत विस्तारलेलं आहे. या टोळीचा म्होरक्या झारखंडमधील अलिमुद्दीन अन्सारी आहे. पोलिसांनी अलिमुद्दीन आणि आझमगडच्या मनोज यादवला अटक केली आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यातील 81 डेबिट कार्ड, 104 चेकबुक, 130 पासबुक, 8 फोन, 31 सिम कार्ड, आयडी प्रूफची फोटोकॉपी इत्यादी सामान जप्त करण्यात आलं आहे.त्या वयोवृद्धांच्या बँकेतून गरिबांच्या खात्यात पैसे वळते केल्यानंतर लागलीच हे चोर ते पैसे काढून घेत असत. गरिबांची बँक खाती 1100 रुपयांपासून उघडण्यात आली आहेत. या टोळीचा मनोज यादव हे काम करत होता. तो कामगारांना 2 रुपये देऊन खातं उघडत होता. पैसे दिल्यानंतर या लोकांचं आधार कार्ड आणि पॅन कार्डची माहिती घेत होता. या लोकांबरोबर जाऊन आधार कार्डचा अॅड्रेस बदलून घेत होता आणि चुकीच्या पत्त्यावर खाती उघडत होता. यादरम्यान मनोज स्वतःचाच नंबर बँकेत रजिस्ट्रर करत होता.  कसे बनवत होता शिकारया फसवणुकीचा मास्टर माइंड असलेला अलिमुद्दीन अन्सारी वयोवृद्धांना फोन करून बँकेचा कर्मचारी असल्याचं सांगत होता. त्यानंतर तो लोकांकडून बँक अकाऊंट किंवा फोन नंबर आधार कार्डला लिंक करून त्यांच्या नावे बँक अकाऊंट, डेबिट कार्ड आणि फोन नंबर, सिम कार्डची माहिती मिळवत होता. त्यानंतर तो एक मेसेज पाठवत होता आणि त्याला 121वर फॉरवर्ड करण्यास सांगत होता. तो मेसेज सिम कार्ड लॉक करण्याचा असायचा. त्यानंतर त्या फसवणूक झालेल्या वयोवृद्धांचं सिम कार्ड डिएक्टिवेट होत असत. तसेच अलिमुद्दीन नवा सिम कार्ड मिळवत असतो त्याद्वारे ओटीपी प्राप्त करत होता. 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड