१०... गुन्हे

By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:35+5:302015-02-11T00:33:35+5:30

सर्पदंशाने विद्यार्थिनीचा मृत्यू

10 ... crime | १०... गुन्हे

१०... गुन्हे

्पदंशाने विद्यार्थिनीचा मृत्यू
खापरखेडा : गाढ झोपेत विषारी सापाने दंश केल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन बिना येथे रविवारी मध्यरात्री घडली.
प्रतीक्षा भाऊराव खंडाते (१७, रा. नवीन बिबना, भानेगाव, ता. सावनेर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती खापरखेडा येथील शंकरराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीची (कला शाखा) विद्यार्थिनी होती. रविवारी रात्री ती आई व बहिणीसोबत झोपली होती. दरम्यान, तिला पायाला दंश झाल्याचे जाणवल्याने तिने लगेच सदर प्रकार आईवडिलांना सांगितला. त्यांनी लगेच डॉक्टरांना बोलावले असता, सापाने दंश केल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. त्यामुळे तिला तत्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वाटेतच तिची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)
***
नांदा शिवारातून बॅटरी लंपास
खापरखेडा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदा शिवारातून चोरट्यांनी ट्रॅक्टरची बॅटरी चोरून नेल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.
फिर्यादी हिरालाल निंबादास रणदिवे (६०, रा. नांदा, ता. सावनेर) यांनी त्यांच्या मालकीचा ट्रॅक्टर नांदा शिवारातील कंपनीच्या आवारात उभा करून ठेवला होता. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या ट्रॅक्टरमधील बॅटरी व लोखंडी पलंग चोरून नेला. या साहित्याची किंमत चार हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
***
कारच्या धडकेत महिला ठार
नागपूर : लाकडाची मोळी घेऊन येत असलेल्या महिलेला भरधाव कारने धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रुईखैरी शिवारात शनिवारी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास घडली.
पूजा सचिन जांभूळकर (२४, रा. रुईखैरी) असे मृत महिलेचे नाव आहे. सदर महिला लाकडांची मोळी डोक्यावर घेऊन रोडच्या कडेने घराकडे पायी येत होती. दरम्यान, एमएच-३१/डीसी-९३५० क्रमांकाच्या भरधाव कारने तिला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने तिला लगेच नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी कारचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून त्याचा शोध घेणे सुरू केले आहे.
***

Web Title: 10 ... crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.