शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे १० ते १२ आमदार राजीनामा देणार?; भाजपाच्या खेळीने राजकारण तापणार   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 08:43 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजीनामा दिलेल्या ५ काँग्रेस आमदारांमध्ये जेवी काकडिया आणि सोमाभाई पटेल हे दोन आमदार असू शकतात.

ठळक मुद्देसंख्याबळ पाहता सत्ताधारी भाजपा राज्यसभेच्या चारपैकी दोना जागा स्वबळावर जिंकू शकतेमध्य प्रदेशपाठोपाठ गुजरातमध्ये काँग्रेसला झटका आतापर्यंत ५ आमदारांनी राजीनामे दिले आहेत

अहमदाबाद - मध्यप्रदेश पाठोपाठ काँग्रेसलागुजरातमध्येही झटका बसला आहे. गुजरातकाँग्रेसच्या चार आमदारांच्या राजीनाम्यानंतर आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. आतापर्यंत गुजरातमध्ये काँग्रेसच्या ५ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला आहे. 

विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा देणाऱ्यांच्या नावाचा खुलासा अद्याप झाला नाही. गुजरात विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी काँग्रेसच्या ४ आमदारांचा राजीनामा स्वीकारला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजीनामा दिलेल्या ५ काँग्रेस आमदारांमध्ये जेवी काकडिया आणि सोमाभाई पटेल हे दोन आमदार असू शकतात. निवडणुकीपूर्वी हे दोन्ही आमदार गायब झाले असून काँग्रेसच्या संपर्कातही नाही. त्याचसोबत मंगल गावित आणि प्रद्युमन सिंह जाडेजा यांनी राजीनामा दिला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर काँग्रेस आमदार प्रविण मारु यांनी राजीनामा दिल्याचं स्पष्ट झालं आहे. राजीनामा दिलेले ते पहिले आमदार आहेत. दोन दिवसांपूर्वीच मी राजीनामा दिला होता असा दावा प्रविण मारु यांनी केला आहे. मध्य प्रदेशातील राजकीय उलथापालथीनंतर राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुजरातमध्ये योग्य खबरदारी घेतली आहे. शनिवारी काँग्रेसने १४ आमदारांना जयपूरला हलवलं आहे. गुजरातचे आमदार जयपूरमधील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. 

५ आमदारांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने सर्व आमदारांना जयपूरला नेण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार ५ आमदारांसह अन्य १० ते १२ आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे. यापूर्वी मध्य प्रदेशातील २२ आमदारांनी राजीनामा दिला आहे. 

संख्याबळ पाहता सत्ताधारी भाजपा राज्यसभेच्या चारपैकी दोना जागा स्वबळावर सहज जिंकू शकते. त्याहून जास्त जागांसाठी त्यांना इतरांची मदत लागेल किंवा विरोधकांची मते कमी व्हावी लागतील. हे राजीनामे त्याच रणनीताचा भाग असावा, असे राजकीय निरीक्षकांना वाटते. यामुळे १८२ सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसची संख्या ६९वर आली. हे राजीनामे मी मंजूर केले आहेत. त्यांची नावे मी आज विधानसभेत जाहीर करीन, असे विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले आहे. विधानसभेत राज्यसभेसाठी मतदान २६ मार्च रोजी होणार आहे.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसGujaratगुजरातRajya Sabhaराज्यसभा