शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

‘तेजस’मध्ये २५ लाखांचा नि:शुल्क विमा;  दिल्ली-लखनौ गाडीबाबत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 06:44 IST

आरामदायी सुविधांचाही समावेश

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन मंडळाने (आयआरसीटीसी) प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला २५ लाख रुपये नि:शुल्क विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे आरामदायी प्रवासासाठी कमी किमतीत सामानाची ने-आण, टॅक्सी, हॉटेल बुकिंग यांसारख्या सुविधाही देण्यात येणार आहेत.

पहिल्यांदाच एखाद्या गाडीची पूर्ण जबाबदारी आयआरसीटीसीकडे सोपवण्यात आली आहे. प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी काही रेल्वे गाड्या खासगी संस्थांमार्फत चालवण्याचा निर्णय सरकारकडून १०० दिवसांच्या आत घेण्यात येणार होता. तेजस एक्स्प्रेस आयआरसीटीसीकडे सोपवून सरकारने त्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.

आयआरसीटीसीच्या दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेसमधून प्रवास करणाºया प्रवाशांना २५ लाख रुपये विमा देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे लखनौ स्थानकात प्रतीक्षालय आणि नवी दिल्ली स्थानकावर प्रवाशांसाठी सुसज्ज बैठकव्यवस्था करण्यात येणार असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले. या गाडीमध्ये सवलत, विशेष सुविधा आणि नोकरीचा पासची सुविधा उपलब्ध असणार नाही. तसेच, पाच वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना पूर्ण तिकीट घ्यावे लागणार आहे. त्याचप्रमाणे गाडीत चहा, कॉफी, पाणी मोफत दिले जाणार असून विमानाप्रमाणे कर्मचाऱ्यांकडून जेवण देण्यात येणार आहे.

आठवड्यातून सहा दिवस ही गाडी धावणार असून मंगळवारी ती बंद ठेवण्यात येणार आहे. गाडी दिल्लीतून सायंकाळी साडेचार वाजता सुटणार असून रात्री पावणे अकरा वाजता लखनौ येथे पोहोचेल.तात्काळ कोट्याला बगलदिल्ली-लखनौ गाडीत तात्काळ कोट्याला बगल देण्यात आली आहे. एक्झिक्युटिव्ह श्रेणी आणि एसी चेअर कार श्रेणीच्या प्रत्येक डब्यात पाच जागा परदेशी पर्यटकांसाठी आरक्षित असणार आहेत. गाडीचे भाडे मागणी आणि सण यांनुसार बदलण्यात येणार आहे. या गाडीसाठी प्रवासाआधी किमान दोन महिने अगोदर बुकिंग करता येणार आहे. सामूहिक बुकिंगसाठी एका डब्यात ७८ जागा असणार असून आॅनलाईन सुविधा उपलब्ध आहे.

टॅग्स :railwayरेल्वे