मध्य प्रदेशात 1क्क् विद्याथ्र्याना अटक
By Admin | Updated: June 20, 2014 03:00 IST2014-06-20T03:00:48+5:302014-06-20T03:00:48+5:30
वैद्यकीय पूर्व प्रवेश परीक्षा (पीएमटी) गैरमार्गाने उत्तीर्ण झाल्याप्रकरणी सुमारे 1क्क् विद्याथ्र्याना विशेष कृतिदलाने मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यातून अटक केली.

मध्य प्रदेशात 1क्क् विद्याथ्र्याना अटक
>नवी दिल्ली : वैद्यकीय पूर्व प्रवेश परीक्षा (पीएमटी) गैरमार्गाने उत्तीर्ण झाल्याप्रकरणी सुमारे 1क्क् विद्याथ्र्याना विशेष कृतिदलाने मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यातून अटक केली.
मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा मंडळाने (एमपीपीईबी) पीएमटी घेतली होती. 2क्13 मध्ये घोटाळा उघडकीस आल्यानंतर एमपीपीईबीच्या वरिष्ठ अधिका:यांना अटक करण्यात आली.
या घोटाळ्याची चौकशी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या निगराणीत होत आहे. न्यायालयाने एसटीएफला या प्रकरणाचा स्थितीदर्शक अहवाल 3क् जूनला सादर करण्याचे निर्देश दिले आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांना निर्देश दिल्यानंतर इंदूर, धार, झाबुआ, खारगोने, भोपाळ, उज्जैन, जबलपूर आणि सागर आदी जिल्ह्यातून विद्याथ्र्याना अटक करण्यात आली.
अलीकडे झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने याप्रकरणातील मोठय़ा आरोपींना अजून अटक न झाल्याबद्दल पोलिसांविरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर एसटीएफने राज्याचे माजी तंत्र शिक्षण मंत्री आणि भाजपा नेते लक्ष्मीकांत शर्मा यांना 15 जूनला अटक केली होती. त्यांच्यावर कंत्रटी शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप आहे. कंत्रटी शिक्षक परीक्षा देखील एमपीपीईबीने आयोजित केली होती.
(वृत्तसंस्था)