रामदेव बाबांचे शीर कापणा-यास मिळणार १ कोटींचे बक्षीस

By Admin | Updated: May 6, 2014 11:35 IST2014-05-06T10:57:40+5:302014-05-06T11:35:51+5:30

योगगुरू रामदेव बाबा यांचे शीर कापणा-यास एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा पंजाबमधील होशियारपूर येथील बसप उमदेवार भगवान सिंह चौहान यांनी केली आहे.

1 crore prize for getting Ramdev's head | रामदेव बाबांचे शीर कापणा-यास मिळणार १ कोटींचे बक्षीस

रामदेव बाबांचे शीर कापणा-यास मिळणार १ कोटींचे बक्षीस

बसप उमेदवाराची घोषणा
ऑनलाइन टीम
जालंधर, दि.६ - योगगुरू रामदेव बाबा यांचे शीर कापणा-यास एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा पंजाबमधील होशियारपूर येथील बसप उमदेवार भगवान सिंह चौहान यांनी केली आहे. रामदेवबाबा यांनी दलितविरोधी वक्तव्य केल्याने नाराज झालेल्या चौहान यांनी ही घोषणा केली. 
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करत ते दलितांच्या घरी पिकनिकसाठी जात असल्याचे वक्तव्य रामदेव बाबांनी केले होते. या वक्तव्यावरून त्यांच्यावर सर्व स्तरांतून टीका करण्यात आली होती. तसेच त्यांच्याविरोधात दोन गुन्हेही दाखल करण्यात आले. 
त्याच पार्श्वभूमीवर होशियारपूरमध्ये रविवारी बसप कार्यकर्त्यांनी त्यांचा पुतळा जाळला. रामदेव बाबांनी महिलांचा अपमान केल्याचे सांगत चौहान यांनी जो रामदेव बाबांचे शीर आणून देईल, त्याला एक कोटींचे बक्षीस मिळेल अशी घोषणा केली.

Web Title: 1 crore prize for getting Ramdev's head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.