०७... चिमुकली
By Admin | Updated: March 8, 2015 00:31 IST2015-03-08T00:31:03+5:302015-03-08T00:31:03+5:30
(फोटो)

०७... चिमुकली
(फ ोटो)चिमुकलीचा टाक्यात बुडून अंतदहेगाव (रंगारी) येथील घटना : होळीच्या उत्सवावर दु:खाचे सावटखापरखेडा/कोराडी : आई घरात स्वयंपाक करीत असताना तिच्या अवतीभोवती खेळणारी दीड वर्षाची चिमुकली नकळत अंगणात गेली आणि ती अंगणातील तीन फूट खोल टाक्यात कोसळली. त्यातील पाण्यात तिचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सावनेर तालुक्यातील दहेगाव (रंगारी) येथे गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे गावात कुठेही होळी पेटविण्यात आली नाही. ईश्वरी प्रवीण जाधव (१८ महिने) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. ईश्वरीचे वडील प्रवीण जाधव हे स्टार बसवर चालक म्हणून नोकरी करतात. होळीच्या दिवशी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. त्यामुळे घरी ईश्वरीची आई कीर्ती जाधव आणि प्रवीण जाधव यांची भाची साक्षी या दोघीच होत्या. होळी असल्याने त्या दोघेीी स्वयंपाक करण्यात व्यस्त होत्या. त्याच वेळी ईश्वरी ही त्यांच्या अवतीभोवती खेळत होती. दरम्यान, काही वेळाने ईश्वरी ही रांगत अंगणात आली. तिच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. त्यांच्या घराच्या अंगणात असलेल्या विहिरीच्या बाजूला तीन फूट खोल टाके आहे. ईश्वरी ही खेळत या टाक्याजवळ आली आणि कुणाचेही लक्ष नसताना त्या टाक्यात कोसळली. त्यानंतर अर्ध्या तासाने तिची आई कीर्ती ही छतावर सुकविण्यासाठी टाकलेले कपडे काढण्यासाठी बाहेर आली. त्याच वेळी तिला ईश्वरी ही टाक्यातील पाण्यात तरंगत असताना आढळून आली. सदर दृश्य पाहताच तिने हंबरडा फोडला. सदर घटनेमुळे कीर्तीला जबर मानसिक धक्का बसला. त्यामुळे शेजारी गोळा झाले. क्षणार्धात सदर बातमी गावभर पसरली. त्याच वेळी स्थानिक तरुण व ग्रामस्थांनी गावातील हनुमान मंदिराच्या आवारात सार्वजनिक होळी पेटविण्याची तयारी चालविली होती. सदर बातमी कळताच त्यांनीही ईश्वरीच्या घराकडे धाव घेतली. तिच्या पार्थिवावर धूलिवंदनाच्या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे दहेगाव (रंगारी) येथे कुणीही धूलिवंदनाला रंग खेळले नाही. (प्रतिनिधी/वार्ताहर)***