०६... सारांश... जोड

By Admin | Updated: February 7, 2015 02:05 IST2015-02-07T02:05:02+5:302015-02-07T02:05:02+5:30

सार्वजनिक उद्यान तयार करा

06 ... Summary ... pair | ०६... सारांश... जोड

०६... सारांश... जोड

र्वजनिक उद्यान तयार करा
नरखेड : नजीकच्या मोवाड येथे व्यवस्थित सार्वजनिक उद्यान नाही. त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना वेळ घालण्यासाठी मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या ठिकाणी स्थानिक नगर परिषद प्रशासनाने सुुसज्ज सार्वजनिक उद्यानाची निर्मिती करावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.
***
सार्वजनिक विहिरींचे अस्तित्व धोक्यात
काटोल : नळ योजनांमुळे ग्रामीण भागातील सार्वजनिक विहिरींचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे त्या विहिरी मोडकळीस आल्या आहेत. या विहिरींचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनरुज्जीवन करावे तसेच त्यांचा पुनर्भरणासाठी वापर करावा, अशी मागणी पर्यावरण अभ्यासकांनी केली आहे.
***
नाले खोल करण्याची मागणी
नरखेड : तालुक्यातील बहुतांश नाले बुजलेले आहेत. त्यामुळे पुराचे पाणी लगतच्या शेतातून वाहत असल्याने पिकांचे व शेतांचे नुकसान होते. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने नाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे खोलीकरण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
***
विविध योजनांपासून शेतकरी अनभिज्ञ
नागपूर : केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविते. मात्र, त्या योजनांची शेतकऱ्यांना माहिती नसल्याने ते लाभ घेऊ शकत नाही. परिणामी, त्या योजनांचा बट्ट्याबोळ होत असल्याने कृषी विभागाने जनजागृती अभियान राबवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
***

Web Title: 06 ... Summary ... pair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.