०६....सारांश
By Admin | Updated: February 7, 2015 02:05 IST2015-02-07T02:05:03+5:302015-02-07T02:05:03+5:30
वाळलेले झाड कोसळण्याची शक्यता

०६....सारांश
व ळलेले झाड कोसळण्याची शक्यताखापा : स्थानिक जवाहर विद्यालय मार्गाच्या कडेला वाळलेले मोठे झाड आहे. हा मार्ग वाहतुकीचा असून, विद्यार्थ्यांचीही वर्दळ असते. सोसाट्याच्या वाऱ्याने सदर झाड कोसळून अपघात होण्याची शक्यता बळावल्याने ते झाड तोडण्याची मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.*** कुही येथे प्रकटदिनामित्त कार्यक्रमकुही : स्थानिक पटेल ले-आऊटमध्ये श्री संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली असून, ते बुधवारपर्यंत चालणार आहेत. भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.***मौदा नगर स्वच्छता अभियानमौदा : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने मौदा शहरात नुकतेच नगरस्वच्छता अभियान राबविण्यात आले. यात बसस्थानक, आठवडी बाजार, पंचायत समिती कार्यालय, मुख्य रस्ता यासह अन्य भागाची साफसफाई करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. स्वच्छतेचे महत्त्वही पटवून देण्यात आले. ***खतांच्या टंचाईमुळे शेतकरी त्रस्तकळमेश्वर : तालुक्यात सध्या युरियासह अन्य महत्त्वाच्या रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे रबीच्या पिकांना आवश्यक असलेली खते कुठून आणावी, अश प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. कृषी विभागाने खते उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. *** सिमेंटरोड निर्मितीसाठी निधी द्यामेंढला : गावातील अंतर्गत रस्ते खराब होत आहेत. त्या रस्त्यांचे सिमेंटीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे सिमेंटरोडच्या बांधकामासाठी आ. डॉ. आशिष देशमुख यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी उपसरपंच गोपाल घोरसे, ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम दंढारे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.***नुकसानभरपाई मिळणार कधी?नरखेड : पावसाळ्यात तालुक्यातील नदी व नाल्यालगतची शेती पुरात खरडून गेली होती. त्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीची शेतकऱ्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे ही नुकसानभरपाई कधी मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. ***