०६... रामटेक... आंदोलन
By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:18+5:302015-02-06T22:35:18+5:30
(फोटो)

०६... रामटेक... आंदोलन
(फ ोटो)एपीएल कार्डधारकांना पूर्ववत धान्यपुरवठा करा!काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे धरणे आंदोलन : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन रामटेक : शासनाने एपीएल (दारिद्र्य रेषेवरील) राशनकार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून करण्यात येणारा धान्यपुवठा बंद केला आहे. हा धान्यपुरवठा पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्थानिक तहसील कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी (महसूल) शेखर सिंह यांना निवेदनही देण्यात आले. शहरातील बहुतांश गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांकडे एपीएल शिधापत्रिका आहेत. पूर्वी त्या कुटुंबांना कमी किमतीत स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळायचे. मात्र, शासनाच्या निर्णयानुसार डिसेंबरपासून त्या कुटुंबांना धान्य मिळणे बंद झाले आहे. देशात धान्याचे मुबलक उत्पादन होत असून, गोदामात धान्य पडलेले आहे. त्यातच एपीएल कार्डधारकांचे धान्य बंद करण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा अन्यायकारक आहे, असा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निवेदनात केला आहे. हा धान्यपुरवठा बंद करतेवेळी शासनाने कोणतेही कारण स्पष्ट केले नाही. त्यामुळे सदर धान्यपुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.दामोदर धोपटे व चंद्रपाल चौकसे यांच्या नेतृत्वातील या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य शांत कुमरे, अशोक बर्वे, इसराईल शेख, पी.टी. रघुुवंशी, माजी नगराध्यक्ष शोभा राऊत, नगरसेविका तुळसा महाजन, राजू बघेले, शुभांगी रामेलवार, भाऊराव रहाटे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)***