०९... सावनेर.....लाईन
By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:22+5:302015-02-10T00:56:22+5:30
उच्च दाबाच्या लाईनसाठी तारांऐवजी केबल टाकणार

०९... सावनेर.....लाईन
उ ्च दाबाच्या लाईनसाठी तारांऐवजी केबल टाकणारपालकमंत्र्यांची माहिती : नागरी वस्तीत धोका उद्भवण्याची शक्यतासावनेर : स्थानिक शहरातील नागरी वस्त्यांमधून ११ के व्ही क्षमतेची विद्युत लाईन केली आहे. या तारांमुळे भविष्यात उद्भवणारा धोका विचारात घेता त्या ठिकाणी केबल टाकण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सावनेर शहरातील वॉर्ड क्रमांक -१, २, ३ व ५ मधील बसस्थानक परिसर, जवाहर कन्या शाळा, अवधूतवाडी, तहसील कार्यालय परिसर आदी ठिकाणाहून ११ केव्ही क्षमतेची विद्युत लाईन केली आहे. हा संपूर्ण परिसर दाट लोकवस्तीचा असून, लहान मुले घराच्या छतावर नेहमीच खेळतात. शिवाय, या भागांमध्ये इमारतींचे बांधकामही सुरू असते. त्यामुळे विजेच्या धक्क्याने जीवित हानी होण्याची शक्यता लक्षात घेता, या ठिकाणी तारांऐवजी केबल टाकण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी फार पूर्वी केली होती. त्या मागणीकडे आजवर दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदर मागणी गांभीर्याने घेत त्या लाईनच्या तारा हटवून त्या ठिकाणी केबल टाकण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी अंदाजे १० ते १५ लाख रुपये खर्च येणार असून, हा खर्च स्थानिक नागरिक अथवा पालिका प्रशासन करू शकत नाही. त्यामुळे सदर कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीचा पालिका प्रशासनाने ठराव पारित केला होता. माजी नगराध्यक्ष ॲड. अरविंद लोधी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले. त्यावर सहायक अभियंता यांना केबल टाकण्याचा प्रस्ताव तयार करून सदर प्रस्ताव मार्गपूर्वी डीपीडीसीला पाठविण्याची सूचना बावनकुळे यांनी केली. सदर काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)***