जि.प. आरोग्य पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आढाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:41 IST2020-12-11T04:41:45+5:302020-12-11T04:41:45+5:30

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अध्याशी अध्यक्ष महेश कासार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूकप्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी मधुकर आढाव यांच्या अर्जावर सूचक म्हणून ...

Z.P. Review as President of Arogya Patsanstha | जि.प. आरोग्य पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आढाव

जि.प. आरोग्य पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आढाव

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अध्याशी अध्यक्ष महेश कासार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूकप्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी मधुकर आढाव यांच्या अर्जावर सूचक म्हणून फैय्याज खान व अनुमोदक म्हणून विजय देवरे यांनी स्वाक्षरी केली. उपाध्यक्षपदासाठी श्रीकांत अहिरे व सचिवपदासाठी तुषार पगारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जी. पी. खैरनार यांनी केले. संस्थेचा कार्यालयीन खर्च सलग पाच वर्ष संचालक स्वत:च्या खर्चातून करणार असल्याचे खैरनार यांनी नमूद केले. सभेस मधुकर आढाव, एफ.टी. खान, विजय देवरे, विजय सोपे, संजय पगार, सुनील जगताप, जयवंत सोनवणे, तुषार पगारे, प्रशांत रोकडे, जे.पी.सूर्यवंशी, श्रीकांत अहिरे, गोरक्षनाथ लोहकरे, सोनाली तुसे, सुलोचना भामरे व व्यवस्थापक रामदास वडनेरे उपस्थित होते. (फोटो ०९ झेडपी)

Web Title: Z.P. Review as President of Arogya Patsanstha