जि.प. सदस्या नूतन आहेर यांना डॉक्टरेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST2021-09-13T04:14:15+5:302021-09-13T04:14:15+5:30
वाखारी गटाच्या जि.प. सदस्या नूतन आहेर यांनी ग्रामविकास, राजकीय, व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी अमेरिकन युनिव्हर्सिटी फॉर ग्लोबल पीस ...

जि.प. सदस्या नूतन आहेर यांना डॉक्टरेट
वाखारी गटाच्या जि.प. सदस्या नूतन आहेर यांनी ग्रामविकास, राजकीय, व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी अमेरिकन युनिव्हर्सिटी फॉर ग्लोबल पीस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या संयुक्त विद्यमाने अहमदाबाद येथे नेल्सन मंडेला नोबेल शांतता पुरस्कार सोहळ्यात नुकतीच डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. यानिमित्त देवळा तालुका नागरी सत्कार सोहळा समितीच्या वतीने डॉ. नूतन आहेर यांना सन्मानित करण्यात आले. वत्सला लॉन्स येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार होते. यावेळी कादवा साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, माजी आमदार संजय चव्हाण, मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, तालुकाध्यक्ष सुनील आहेर, माधवराव बनकर, विलास देवरे, दगा निकम, शैलेश सूर्यवंशी, संदीप पवार, लालचंद सोनवणे, सभापती केशरबाई आहीरे, धर्मा देवरे, अमोल पाटील, महेंद्र काळे, प्रफुल्ल पगार, दशरथ निकम आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. किशोर खरोटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. तुषार शेवाळे, माजी आमदार संजय चव्हाण, सुनील आहेर, यशवंत सिरसाठ, अमोल पाटील, प्रभाकर पाटील, सरपंच भाऊसाहेब अहिरे, आदींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गोरख निकम यांनी केले.