वळवाडीत वडनेर बिटाच्या जिल्हा परिषद चषक स्पर्धा
By Admin | Updated: January 18, 2016 21:56 IST2016-01-18T21:54:53+5:302016-01-18T21:56:34+5:30
वळवाडीत वडनेर बिटाच्या जिल्हा परिषद चषक स्पर्धा

वळवाडीत वडनेर बिटाच्या जिल्हा परिषद चषक स्पर्धा
वडेल : वळवाडे येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात वडनेर बिटाच्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा झाल्या. उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी एस.ए. निकम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शंभर मीटर धावणे, कबड्डी, खो-खो या मैदानी स्पर्धांबरोबरच वक्तृत्व, चित्रकला, वैयक्तिक गायन व नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. यात खाकुर्डी येथील जि.प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी खंडोबाचे, तर डाबलीच्या जि. प. शाळेने ‘जहर खाऊ नका’ हे गीत सादर केले.
यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. समालोचन संतोष कांबळे व शरद देवरे यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक शरद लोंढे, केंद्रप्रमुख नामदेव पवार, निंबा कदम, अशोक भामरे आदि उपस्थित होते. लहान गटातून विजयी झालेले विद्यार्थी- वक्तृत्व स्पर्धा- कीर्तीका पवार (वडनेर), चित्रकला- ज्ञानेश्वर बोरसे (अजंग), गीतगायन- भूषण ह्याळीज (विराणे), नृत्य- प्रिया खैरनार (विराणे), तर मोठ्या गट- वक्तृत्व- प्रियंका मोहिते (विराणे), चित्रकला- नाजमीन खाटीक (वडेल), नृत्य- गायत्री निकम (अजंग), ४०० मीटर धावणे- समाधान सोनवणे, २०० मीटर धावणे- मनीषा गायकवाड यांनी यश मिळविले. (वार्ताहर)