शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
2
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
3
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
6
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath
7
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
8
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
9
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
10
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
12
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
13
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
14
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
15
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
16
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
17
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
18
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
19
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
20
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता

नाशिक जिल्हा परिषदेने कार्यारंभ आदेश रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 8:06 PM

विधानसभेची आचारसंहिता लागू होताच, जिल्हा परिषदेची गर्दी ओसरली. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शुक्रवारी दुपारी बारा वाजेपासून जिल्हा परिषद प्रशासनाने आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली असून,

ठळक मुद्देआचारसंहितेत कामे सुरू केल्यास गुन्हा : ग्रामसेवक करणार तपासणीआवारातील पदाधिका-यांची नामफलके झाकण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेला गराडा टाकून बसलेल्या ठेकेदारांनी काढता पाय घेतला असून, निवडणुकीची घोषणा होताच जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची दालने ओस पडली, तर सदस्यांनीही पाठ फिरविल्याने शुक्रवारी जिल्हा परिषदेत शुकशुकाट निर्माण झाला. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून जिल्हा परिषदेने आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अनेक कामांचे कार्यारंभ आदेश जारी केले असून, ती कामे यापूर्वीच सुरू झाली असतील तर ठीक, परंतु आचारसंहिता लागू झाल्यानंतर गुपचूप कामे सुरू करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता गृहीत धरून मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी सर्व कामांची पाहणी करण्याचे आदेश जिल्ह्यातील ग्रामसेवकांना दिले आहेत.

विधानसभेची आचारसंहिता लागू होताच, जिल्हा परिषदेची गर्दी ओसरली. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शुक्रवारी दुपारी बारा वाजेपासून जिल्हा परिषद प्रशासनाने आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली असून, बांधकाम, लघु पाटबंधारे, पाणीपुरवठा, ग्रामपंचायत आदी विभागांचे दप्तर ताब्यात घेतले असून, कोणत्याही नवीन कामांचे आदेश वा पत्रव्यहार करू नये, अशा स्पष्ट सूचना खाते प्रमुखांना देण्यात आल्या. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून नवीन कामांचे कार्यारंभ आदेश मोठ्या प्रमाणात देण्यात आले, त्या कामांची यादीही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व खाते प्रमुखांकडून मागविली असून, ही यादी निवडणूक विभागाला सादर करण्यात येणार आहे. या नवीन कामांमधील किती कामे प्रत्यक्ष सुरू झाली त्याचीही पाहणी ग्रामसेवकांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जी कामे सुरू झाली आहेत, ती कामे पूर्ण करण्यात येतील परंतु आचारसंहिता लागल्यानंतर अशी कामे गुपचूप सुरू करण्याचा ठेकेदारांचा प्रयत्न नाकारता येणार नसल्याचे गृहीत धरून मंजूर कामांची यादी तालुका पातळीवर पाठवून कामांची पाहणी करण्यात येणार आहे. तसा प्रकार आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी दिला.शुक्रवारी दुपारी भुवनेश्वरी यांनी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर तालुका पातळीवरदेखील त्याबाबत दक्षता घेण्यासाठी शनिवारी सकाळी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या पदाधिका-यांची वाहने जमा करण्याबरोबरच त्यांच्या कार्यालयाचा राजकीय प्रचारासाठी वापर होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, जिल्हा परिषदेच्या आवारातील पदाधिका-यांची नामफलके झाकण्यात आली आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद