शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जिल्हा परिषद सदस्य आणि आमदारांनी ग्रामसेवकांच्या चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:24 IST

नाशिक : वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी इतर आमदारांना डावलून आमदार बाळासाहेब सानप यांचा दरबार गाठला असला तरी मीणा यांचे समर्थन करीत काही जिल्हा परिषद सदस्य आणि आमदारांनी ग्रामसेवकांच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देमागणी करीत मंत्रालय गाठले सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

नाशिक : वादग्रस्त मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी इतर आमदारांना डावलून आमदार बाळासाहेब सानप यांचा दरबार गाठला असला तरी मीणा यांचे समर्थन करीत काही जिल्हा परिषद सदस्य आणि आमदारांनी ग्रामसेवकांच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच ग्रामसेवक आणि मुख्य कार्यकारी अधिकाºयांमध्ये ‘समझोता’ झाला असतानाही मीणा समर्थकांनी चौकशीची मागणी करीत मंत्रालय गाठले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी जिल्हाधिकारी तसेच आमदार बाळासाहेब सानप यांच्या माध्यमातून आपल्या विरोधातील बंड शमविण्याचा प्रयत्न यशस्वी करून दाखविला असताना आदिवासी संघटनांनी केवळ ग्रामसेवकांचीच नव्हे तर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुकदेव बनकर, विभाागीय आयुक्त महेश झगडे यांच्या चौकशीची मागणी करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. संघटनेचे हे आंदोलन मीणा यांना अडचणीत आणण्यासाठी केले जात असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे. जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक बाबी उघड झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ आदिवासी महादेव कोळी संघटनेने त्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला होता. मीणा यांच्यावर आदिवासी असल्यानेच दबाव आणला जात असल्याचा आरोप करीत जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली होती, तर आमदारांच्या अन्य एका गटाने जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन मीणा यांच्याविरोधात अपप्रचार केला जात असल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे मीणासमर्थक आणि मीणाविरोधक असे आमदारांचे दोन गट एकमेकांसमोर ठाकले होते. समर्थकांना डावलून मीणा यांनी आमदार बाळासाहेब सानप यांचा हात धरल्याने स्थानिक जि. प. सदस्य तसेच काही आमदारांनी उघड नाराजी दर्शविली होती. त्यामुळे समर्थक नेते मीणा यांची साथ सोडून देतील अशी अटकळ बांधली जात असताना समर्थकांनी मीणा यांची बाजू घेत थेट विभागीय आायुक्तांचीच चौकशी करण्याची मागणी संघटनेने केल्यामुळे संघटनेने एका दगडात अनेक पक्षी मारण्याची खेळी केल्याचे बोलले जात आहे.मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी काहींची नाराजी दूर केलेली असतानाही त्यांच्याच चौकशीसाठी संघटना आता आक्रमक भूमिका घेऊ पाहत आहे. त्यामुळे आगामी काळात एकेकाळचे मीणा समर्थक यांच्या विरोधात आंदोलनाची धार वाढली जाण्याची शक्यता आहे.ग्रामसेवकांवर संघटेनेचे लक्षग्रामसेवक संघटनेचे कैलास वाघचौरे, सुरेश भोजने, संजय गिरी, प्रमोद ठाकरे यांना पाठीशी घालणारे यापूर्वीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सध्याचे उपायुक्त सुखदेव बनकर, विभागीय आयुक्त महेश झगडे यांची चौकशी करण्याची मागणी आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेने केली आहे. दीपककुमार मीणा यांची बदली करण्यात येऊ नये अशीदेखील मागणी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.ग्रामसेवक संघटनेवर आरोपग्रामसेवक संघटनेवर आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेने आक्षेप घेतला आहे. दोनच दिवसांपूर्वी ग्रामसेवक संघटनेने आंदोलन तूर्तास मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. ग्रामसेवक संघटना आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यात बोलणी झाल्यानंतरही आदिवासी विकास संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.