जिल्हा परिषदेची सभा पुन्हा ऑनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:14 IST2021-04-06T04:14:15+5:302021-04-06T04:14:15+5:30

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हा परिषदेच्या सर्व प्रकारच्या सभा ऑनलाइन घेण्यात याव्यात अशा सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या होत्या. ...

Zilla Parishad meeting online again | जिल्हा परिषदेची सभा पुन्हा ऑनलाइन

जिल्हा परिषदेची सभा पुन्हा ऑनलाइन

गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हा परिषदेच्या सर्व प्रकारच्या सभा ऑनलाइन घेण्यात याव्यात अशा सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या होत्या. त्यानुसार सर्वसाधारण सभेसह विषय समिती, स्थायी समितीच्या सभा ऑनलाइन घेण्यात आल्या. मात्र कोरोनाचा प्रभाव कमी होताच याबाबतचे निर्बंध शिथिल करण्यात आले होते. विषय समितीच्या सभा प्रत्यक्षात घेण्यात आल्या, तर मार्च महिन्यात स्थायी समितीचे सभादेखील सभागृहात घेण्यात आली होती. गुरुवारी (दि.८) रोजी बोलविण्यात आलेली स्थायी समितीची सभादेखील सभागृहात घेण्याचे ठरविण्यात आले होते, परंतु आता कोरोनाचा प्रभाव वाढताच शासनाने सर्व प्रकारच्या सभा ऑनलाइन घेण्याच्या सूचना दिल्याने ही सभाही ऑनलाइन होणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी सांगितले.

Web Title: Zilla Parishad meeting online again