जिल्हा परिषद : अध्यक्ष- उपाध्यक्षांनी पदभार स्वीकारला

By Admin | Updated: March 27, 2017 21:43 IST2017-03-27T21:43:31+5:302017-03-27T21:43:31+5:30

जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे व उपाध्यक्ष नयना रमेश गावित यांनी त्यांचा पदभार सोमवारी स्वीकारला.

Zilla Parishad: Chairman - Vice President took charge | जिल्हा परिषद : अध्यक्ष- उपाध्यक्षांनी पदभार स्वीकारला

जिल्हा परिषद : अध्यक्ष- उपाध्यक्षांनी पदभार स्वीकारला



नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे व उपाध्यक्ष नयना रमेश गावित यांनी त्यांचा पदभार सोमवारी (दि.२७) दुपारी स्वीकारला. यावेळी शिवसेना व कॉँग्रेसचे नेते तसेच ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पदभार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांच्या हस्ते सिन्नर तालुक्यातील शहीद जवान संदीप ठोक यांच्या मातोश्री विमल सोमनाथ ठोक यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या सेसमधून २१ हजारांचा धनादेश प्रदान करण्यात आला. याचवेळी जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या वतीने जिल्हाध्यक्ष कैलास वाकचौरे यांनीही २१ हजारांचा चेक विमल ठोक यांना प्रदान केला. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात पदग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार निर्मला गावित, अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित यांनी मनोगत व्यक्त केले.

Web Title: Zilla Parishad: Chairman - Vice President took charge