जायखेडा सोसायटी संचालक विजय लाडे यांचे पद रद्द
By Admin | Updated: February 3, 2016 23:06 IST2016-02-03T23:06:07+5:302016-02-03T23:06:59+5:30
जायखेडा सोसायटी संचालक विजय लाडे यांचे पद रद्द

जायखेडा सोसायटी संचालक विजय लाडे यांचे पद रद्द
जायखेडा : येथील जायखेडा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक विजय लाडे यांना अपात्र ठरविण्यात आल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सटाण्याचे सहायक निबंधक चंद्रकांत विघ्ने यांनी तसे आदेश दिले आहेत. विजय लाडे हे स्थानिक सहकारी पतसंस्थेचे थकबाकीदार असल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९१६ चे कलम ७३ क अ व कलम ७८अ (१) ब अन्वये ही कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.