इगतपुरी तालुक्यात युवकांची मुसंडी

By Admin | Updated: August 8, 2015 23:03 IST2015-08-08T23:01:59+5:302015-08-08T23:03:11+5:30

इगतपुरी तालुक्यात युवकांची मुसंडी

Yugupi's challenge in Igatpuri taluka | इगतपुरी तालुक्यात युवकांची मुसंडी

इगतपुरी तालुक्यात युवकांची मुसंडी

घोटी: इगतपुरी तालुक्यातील दोन सार्वत्रिक व बारा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीत युवकांनी मुसंडी मारली आहे.
माजी आमदार शिवराम झोले यांच्याकडे सत्तेची चावी असणाऱ्या शेनवड खुर्द ग्रामपंचायतीच्या ७ पैकी एकमेव जागा आली. मीरा झोले बिनविरोध निवडून आल्या. निवडून आलेले अन्य उमेदवार पुढीलप्रमाणे- उमाजी वारघडे, इंदुबाई वारघडे, बापू वारघडे, मीना वारघडे, प्रकाश ढगे, सुनीता बांगर. ७ सदस्यांच्या गरु डेश्वर ग्रामपंचायतीत ज्ञानेश्वर वारघडे, निर्मला पोटकुले, माधुरी वारघडे,अरुण डगळे, रेखा खोकले, भाऊसाहेब वारघडे, गीता पोटकुले हे निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. टिटोली पोटनिवडणुकीत कुसुम वाघ, दौलत बोंडे, संगीता बोंडे, रुख्मिणी भटाटे बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. फांगुळ गव्हाणमधून बबन वाघ, गंगूबाई वाघ, दौंडत येथून काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या सौभाग्यवती विठाबाई शिंदे, तर बोर्ली येथून हरिश्चंद्र भले हे निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. या गावात युवक वर्गाने बाजी मारल्याचे दिसून आले. पिंप्री सद्रोद्धिन येथे दोन, बलायदुरी तीन, बोर्ली एक, कुऱ्हेगाव एक, देवळे १, कुर्णोली दोन, धार्नोली दोन, पिंपळगांव भटाटा एक, आहुर्ली एक या जागा नेहमीप्रमाणे रिक्त राहिल्या. तहसीलदार महेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका पार पडल्या. (वार्ताहर)

Web Title: Yugupi's challenge in Igatpuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.