मराठा क्रांती मोर्चा समर्थनार्थ  युवकांनी केले मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:13 IST2018-07-26T00:13:02+5:302018-07-26T00:13:26+5:30

मराठा क्रांती मोर्चा समर्थनार्थ मौजे कसबे सुकेणे येथील मराठा युवकांनी मुंडण करीत शासनाचा निषेध व्यक्त केला. बसस्थानक परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या युवकांनी एकत्र येत निदर्शने केली. स्वर्गीय काकासाहेब शिंदे या तरुणास श्रद्धांजली वाहण्यात आली.

The youths in the support of the Maratha Kranti Morcha Banan Munda | मराठा क्रांती मोर्चा समर्थनार्थ  युवकांनी केले मुंडण

मराठा क्रांती मोर्चा समर्थनार्थ  युवकांनी केले मुंडण

कसबे सुकेणे : मराठा क्रांती मोर्चा समर्थनार्थ मौजे कसबे सुकेणे येथील मराठा युवकांनी मुंडण करीत शासनाचा निषेध व्यक्त केला. बसस्थानक परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्या युवकांनी एकत्र येत निदर्शने केली. स्वर्गीय काकासाहेब शिंदे या तरुणास श्रद्धांजली वाहण्यात आली.  यावेळी बाजीराव पाटील, धनंजय भंडारे, संग्राम मोगल, दत्ता पाटील, सचिन मोगल यांनी मनोगत व्यक्त करून आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचे आवाहन केले. यावेळी रामनाथ भंडारे, भगवान भंडारे, सुभाष जाधव, सोमनाथ भागवत, अतुल भंडारे, पापाभाई सय्यद, राजेंद्र आव्हाड, संदीप रहाणे, संदीप मत्सागर, अनिल मोगल, मयूर भंडारे, वृषभ जाधव, सागर मोगल, दर्शन देशमुख, अमोल भंडारे, सचिन जाधव उपस्थित होते.

Web Title: The youths in the support of the Maratha Kranti Morcha Banan Munda