सातपूरला युवकाचा खून
By Admin | Updated: April 11, 2015 00:12 IST2015-04-11T00:10:36+5:302015-04-11T00:12:22+5:30
जलशुद्धीकरण केंद्राजवळ घडलेला प्रकार

सातपूरला युवकाचा खून
सातपूर : वासाळी शिवारात गत आठवड्यात खून झालेल्या अमोल मोहिते या युवकाचे मारेकरी सापडत नाही तोच फाशीच्या डोंगराजवळील जलशुद्धीकरण केंद्राजवळ आणखीण एका युवकाचा खून झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली़ खून झालेल्या युवकाचे नाव संतोष नामदेव कसबे उर्फ पिन्या (३०, रा़ मटण मार्केटच्या मागे, सातपूर) असे आहे़ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मोहिते आणि कसबे यांच्या खुनाच्या घटनांमुळे सातपूर पोलीसही चक्रावले आहेत़
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या अमोल मोहितेचा २ एप्रिल रोजी तिघांनी खून करून त्याचा मृतदेह वासाळी शिवारात आणून टाकला़ या घटनेस आठ दिवस उलटूनही सातपूर पोलीस संशयितांपर्यंत पोहोचू शकलेले नाही़ दरम्यान, शुक्रवारी (दि़१०) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समाधान हिरे हे फाशीच्या डोंगराजवळील जलशुद्धीकरण केंद्र परिसरात गस्त घालीत होते़ त्यावेळी त्यांना एक युवक जखमी अवस्थेत आढळून आला़