पेठरोडवरील दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू
By Admin | Updated: April 4, 2015 01:29 IST2015-04-04T01:27:47+5:302015-04-04T01:29:14+5:30
पेठरोडवरील दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

पेठरोडवरील दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू
नाशिक : पेठ जकात नाक्याजवळ दुचाकीला झालेल्या अपघातात फुलेनगर येथील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली़ अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव रवींद्र जयवंत भुजबळ (वय ३२, रा़ पेठरोड, दत्तनगर, भुजबळ चाळ, पंचवटी) असे आहे़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पेठ रोडवरील जकात नाक्याजवळून दुचाकीने जात असताना अपघात झाला़ त्यामध्ये रवींद्र भुजबळच्या डोक्यास मुका मार लागल्याने १०८ मोबाइल व्हॅनने त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते़ यानंतर त्याच्या नातेवाइकांनी उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांनी घेण्यास नकार दिल्याने पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले़ येथील वैद्यकीय अधिकारी डॉ़ राहुल पाटील यांनी मयत घोषित केले़ दरम्यान, या अपघाताची पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)