तिहेरी अपघातात चेहेडीतील युवक ठार

By Admin | Updated: September 13, 2016 01:46 IST2016-09-13T01:43:46+5:302016-09-13T01:46:03+5:30

तिहेरी अपघातात चेहेडीतील युवक ठार

The youths in Chehdi were killed in a triple crash | तिहेरी अपघातात चेहेडीतील युवक ठार

तिहेरी अपघातात चेहेडीतील युवक ठार

इंदिरानगर : मुंबई-आग्रा महामार्गाच्या समांतर रस्त्यावरील चढ्ढा पार्कसमोर कार व दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात देवळा तालुक्यातील चेहेडीगावचा केतन जाधव (२२) हा युवक जागीच ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़११) रात्रीच्या सुमारास घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पाथर्डी फाट्याकडून मुंबई नाक्याकडे जाणारी कार (एमएच ०४, डीआर ४२३२) व मुंबई नाक्याकडून पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या दोन दुचाकी (एमएच १५, बीजे ७५२८) व (एमएच १९, एव्ही ५७६२) या तिघांची चढ्ढा पार्कसमोर धडक झाली़
या अपघातात दुचाकीस्वार केतन जाधव याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला़ तर दोन जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ या पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. (वार्ताहर)

Web Title: The youths in Chehdi were killed in a triple crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.