भाटगाव येथील तरुणांचा मोटारसायकल अपघातात ठार
By Admin | Updated: December 24, 2015 22:43 IST2015-12-24T22:12:29+5:302015-12-24T22:43:32+5:30
भाटगाव येथील तरुणांचा मोटारसायकल अपघातात ठार

भाटगाव येथील तरुणांचा मोटारसायकल अपघातात ठार
सोग्रस : चांदवड तालुक्यातील भाटगाव येथील राजेंद्र शंकर पोटे (४०) हे मोटारसायकल क्रमांक एम.एच. १५ ९३५७ घेऊन जात असतांना नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल घसरुन जखमी झाले.
राजेंद्र पोटे यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथील आडगावच्या वसंतराव पवार रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत वडाळीभोई पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. ( वार्ताहर)