दुचाकी अपघातात युवक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 17:04 IST2017-10-02T16:52:51+5:302017-10-02T17:04:57+5:30

दुचाकी अपघातात युवक जखमी
नाशिक : आयशर वाहनाने अचानक वळण घेतल्याने दुचाकीस्वार ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़२९) रात्रीच्या सुमारास घडली़ संकेत अशोक धावले (२४ रा. शिवनेरी चौक, संजीवनगर) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संकेत धावले हा दुचाकीवरून (एमएच १५, ईव्ही ५०९१) एक्स्लो पॉइंटकडून अंबड गावाकडे जात होता़ त्यावेळी पुढे जाणाºया आयशर (एमएच ४३ ई ३८९२) चालकाने अचानक वाहन वळविले़ यामुळे संकेत धावले दुचाकीसह ट्रकवर जाऊन आदळला़ यामध्ये त्याचा उजवा पाय फॅक्चर झाला असून अंबड पोलिसांनी आयशर गाडीचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़