अतिक्रमण मोहिमेत युवक जखमी
By Admin | Updated: May 17, 2015 23:34 IST2015-05-17T23:27:50+5:302015-05-17T23:34:16+5:30
अतिक्रमण मोहिमेत युवक जखमी

अतिक्रमण मोहिमेत युवक जखमी
त्र्यंबकेश्वर : येथे सध्या अतिक्रमण मोहीम जोरात सुरू असून, अतिक्रमणप्रमुख प्रांत बाळासाहेब वाकचौरे यांनी एक तासाच्या आत टपरी खोलून घरी न्या, असे सांगून गेले. त्यामुळे घाबरून चंद्रकांत पाबळकर हा इसम घाईगर्दीने टपरीवर चढून टपरी खोलत असताना पाय घसरून खाली पडला. त्यामुळे त्याच्या मणक्यास जबरदस्त मार लागला.
येथील डॉ. पंकज बोरसे यांच्या दवाखान्यात त्यास नेले असताना त्यांनी त्वरित नाशिक येथे नेण्याचा सल्ला दिला. अतिक्रमण मोहिमेचा सध्या सगळ्यांनीच खूप धसका घेतला आहे. त्र्यंबक पालिकेने अतिक्रमण करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. साहजिकच अतिक्रमण करणाऱ्यांची हिंमत वाढली. न.पाच्याच दुर्लक्षामुळे अर्थात अतिक्रमण करणे केव्हाही बेकायदेशीरपणे एकाएकी मोहीम सुरू झाली आणि सर्वांचीच धावपळ उडाली आहे. वाहनतळाचे काम करताना टपऱ्या उठविण्याचे आदेश झाला. टपऱ्या तेथून खाली केल्या. नूतन त्र्यंबक विद्यालयाशेजारील रस्त्याच्या कडेला एका रांगेत रस्त्यापासून सुमारे १५ फूट अंतरावर लावल्या होत्या आणि रविवारी अचानक टपऱ्या काढण्याचे आदेश झाला. एक तासाची मुदत दिली होती.