विजेचा धक्का लागून युवक जखमी
By Admin | Updated: August 12, 2016 22:41 IST2016-08-12T22:38:39+5:302016-08-12T22:41:24+5:30
विजेचा धक्का लागून युवक जखमी

विजेचा धक्का लागून युवक जखमी
सुरगाणा : मालगोंदा येथील युवक भरत लक्ष्मण पवार (२५) नसल्याने वीज दुरुस्तीचे काम करण्यासाठी खांबावर चढला. त्याचक्षणी विजेचा प्रवाह आल्याने जोरदार विजेचा धक्का बसून चाळीस टक्के गंभीर भाजला आहे.
दरम्यान, युवक खांबावरून खाली पडल्याने गंभीर दुखापत झाली आहे. युवकास रक्तस्राव सुरू झाल्यानंतर त्यास तातडीने सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विजेचा धक्का गंभीर स्वरूपाचा असल्याने त्यास सुरगाणा येथे उपचार होऊ शकले
नाहीत. त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रु ग्णालय नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे.
(वार्ताहर)